पंढरपूर नगर परिषदेच्या सभागृहामध्ये पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या लॉटरीची सोडत संगणकावर काढण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नगराध्यक्षा साधना भोसले, उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, माजी नगरसेवक नागेश भोसले, नगरसेवक गुरुदास अंभ्यकर, सुजित सर्वगोड, डिराज सर्वगोड, विक्रम शिरसट, नवनाथ रानगट उपस्थित होते.
पंतप्रधान योजनेतून घर मिळावे यासाठी २०४५ जणांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ९१४ जणांनी दहा हजार रुपये भरले होते. यामुळे ८९२ घरांची लॉटरी सोडत २६ जानेवारीला होणार होती. मात्र घरांची लॉटरी सोडत रद्द करण्यात आली आहे.
मात्र घरांची लॉटरी सोडत रद्द करण्यात आली होती. त्याची सोडत सोमवारी करण्यात आली. जादा अर्ज आलेल्या २२ लोकांची नावे बाजूला काढण्यात आली आहेत. मात्र काही कारणाने ८९२ लोकांपैकी काही लोकांची नावे रद्द झाली. त्या ठिकाणी उरलेल्या २२ लोकांना घर मिळणार असल्याचे मुख्याधिकारी अभिजीत मानोरकर यांनी सांगितले.
हे आहेत प्रतीक्षेत ::::::::::
अमोल सर्वगोड, आप्पा सकटे, श्रीकृष्णा जवंजाळ, सुरूज जाधव, दिगंबर ठेंगील, मंजरी जोशी, सतीश सपताल, भारती नवले, रमेश कुलकर्णी, विमल भुईटे, सफराज बादशहा नदाफ, नंदा पत्रकार, बाळासाहेब इंदापूरकर, शांता सोळंखी, नागेश गायकवाड, योगेश मोरे, सुराज रणदीवे, सविता पवार, कैलास खंडालकर, शोभा शिंदे, ज्ञानेश्वर कुलकर्णी, गणेश घुले या २२ लोकांना घरकुल मिळाले नाहीत.
फोटो :
पंढरपूर नगर परिषदेच्या सभागृहामध्ये पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या लॉटरीची सोडत संगणकावर काढण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, माजी नगरसेवक नागेश भोसले, नगरसेवक गुरुदास अंभ्यकर, सुजित सर्वगोड, डिराज सर्वगोड, विक्रम शिरसट, नवनाथ रानगट आदी.