आप्पासाहेब पाटील - सोलापूरसोलापूर दि़ ३ : पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण कार्यालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपायाच्या ५३ रिक्त पदांसाठी तब्बल ९ हजार ५८० उमेदवारांनी शारीरिक चाचणी परीक्षा दिली़ त्यापैकी ९५९ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत़ या पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा ९ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ८़३० या वेळेत होणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे़सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील आस्थापनेवरील ५३ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली़ त्यासाठी २२ ते ३१ मार्चदरम्यान कवायत मैदानावर पहाटे ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात आली़ या परीक्षेसाठी ग्रामीण पोलिसांचे ३०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते़ ही पारदर्शकपणे भरती प्रक्रिया पोलीस अधीक्षक एस़ वीरेश प्रभू, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) दिलीप चौगुले, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहा़ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी होत आहे़ या परीक्षेत १०० गुण मिळविलेले उमेदवार दिनांकनिहाय (कंसात) पुढीलप्रमाणे : ७१० (२३ मार्च), ६७० (२४ मार्च), ७१६ (२६ मार्च), ६९५ (२६ मार्च), ६७७ (२७ मार्च), ७२६ (२९ मार्च), ०१ (३० मार्च), ८७८ (३१ मार्च)़ -----------------------पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावरच्ग्रामीण पोलीस भरतीत २२ ते ३१ मार्च या कालावधीत घेण्यात आलेल्या शारीरिक चाचणी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांची यादी ग्रामीण पोलीसांच्या संकेतस्थळावर तसेच पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण कवायत मैदान व नियंत्रण कक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रामीण येथील फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे़ -------------शंका असल्यास़़़तक्रार करा४लेखी परीक्षेस पात्र असणाऱ्या उमेदवारांची प्रसिद्ध करण्यात आलेली तात्पुरती यादी संबंधित उमेदवारांनी स्वत: पाहून उमेदवारांच्या नावासमोर दर्शविलेले शारीरिक चाचणीचे गुण, गुणांची बेरीज या सर्व बाबी पडताळून त्या बरोबर असल्याबाबतची खात्री करावयाची आहे़ याबाबत काही तक्रार, शंका, आक्षेप असल्यास लेखी निवेदन ४ एप्रिल २०१७ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) सोलापूर ग्रामीण यांच्याकडे समक्ष सादर करावे़---------------------९ एप्रिलला लेखी परीक्षा४मैदानी चाचणीत पात्र झालेल्या उमेदवारांची लेखी चाचणी परीक्षा ९ एप्रिल २०१७ रोजी सकाळी ७ ते ८़३० या वेळेत पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण कवायत मैदान, साखरपेठ, सोलापूर येथे होणार आहे़ लेखी परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी ९ एप्रिल रोजी पहाटे ४़ ३० वाजता परीक्षा केंद्रावर आवश्यक त्या ओळखपत्रासह उपस्थित राहावे़------------------११ उमेदवारांना १०० पैकी १०० गुण४ग्रामीण पोलीस भरतीत प्रमोद हनुमंत खंडे, सोमनाथ महादेव जगताप, अर्जुन शिवाजी कोकरे, संतोष रामचंद्र जाधव, दत्तात्रय गोरख शिंदे, बसगोंडा नानगोंडा बिराजदार, जितेंद्र वसंतराव मोकाशी, रोहिदास जगन्नाथ शिंदे, गजानन कृष्णा माने, नवनाथ कुंडलिक चव्हाण, दिगंबर एकनाथ मस्के या उमेदवारांनी शारीरिक चाचणी परीक्षेत १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत़----------------------लेखी परीक्षेसाठी प्रवर्गनिहाय माहितीवर्गसर्वसाधारणअनु़जातीसर्वसाधारण९०७८महिला६०५४खेळाडू८८६९प्रकल्पग्रस्त८६७४भूकंपग्रस्त८४—माजी सैनिक ५०७६पोलीस पाल्य५८—होमगार्ड७८५६------------------------सोलापूर ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे़ शारीरिक चाचणी परीक्षेनंतर आता रविवार, ९ एप्रिल २०१७ रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे़ त्यातही पारदर्शकपणा असणार आहे़ कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य अथवा कॉपीसारखा प्रकार उमेदवारांनी केल्यास कारवाई करण्यात येईल़ - एस़ वीरेश प्रभू, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण़----------------------पात्र उमेदवारांची परीक्षा रविवार, ९ एप्रिल रोजी घेण्यात येईल़ उमेदवारांनी परीक्षेला येताना मोबाईल, कॅलक्युलेटर व इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य जवळ बाळगू नये़ अन्यथा कारवाई करण्यात येईल़- दिलीप चौगुलेपोलीस उपअधीक्षक, (मुख्यालय) सोलापूर ग्रामीण़
सोलापूर ग्रामीण पोलीस भरतीत ९५८० पैकी ९५८ उमेदवार पात्र
By admin | Published: April 03, 2017 2:49 PM