शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

coronavirus; महाराष्ट्रातील ९५ भाविक अडकले उत्तर प्रदेशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:03 PM

सोशल मीडियावर मागितली मदत; अखंड हरिनाम सप्ताहासाठी गेले होते वारकरी

ठळक मुद्दे- देशभरात लॉकडाउन करण्यात आल्यामुळे राज्याच्या सीमा बंद- बाहेरील राज्यात गेलेल्या अनेकांना लॉकडाउनचा बसतोय फटका- पंढरपुरातील भाविकांनी मागितली सोशल मिडियावर मदत

सचिन कांबळे 

पंढरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्गजन्य रोगापासून देशातील नागरिकांचा बचाव होण्यासाठी सबंध देश लॉकडाउन केला आहे. यामुळे अखंड हरिनाम सप्ताहासाठी महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमधील श्री क्षेत्र वृंदावन येथे गेलेल्या महाराजांसह ९५ भाविक अडकून पडले आहेत.

पंढरपूर येथील श्रीसंत ज्ञानोबाराय पालखी सोहळ्यातील मानाचे दिंडीप्रमुख व पंढरपूर येथील रहिवासी ह.भ.प. शाम महाराज ननवरे (उखळीकर) हे श्री तीर्थक्षेत्र वृंदावन (उत्तर प्रदेश) येथे त्यांचे शिष्य परिवारासह (९५ लोक) अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यासाठी गेले होते. त्यांचे परतीचे रेल्वे आरक्षणही होते. मात्र, सध्या देशभरात कोरोना (कोविड-१९) च्या अनुषंगाने लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे ते त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. परराज्यात असल्याने व परत येण्याची कोणतीही सोय उपलब्ध होत नाही. त्यांच्या सोबत असलेल्या वयस्कर व्यक्ती, स्त्रिया घाबरून गेल्या आहेत.

या अचानक घडलेल्या गोष्टींमुळे बºयाच जणांना प्रकृती अस्वास्थ्य जाणवत आहे. असे असले तरी  त्यांना महाराष्ट्रातील विविध नेतेमंडळींनी धान्यपुरवठा केला आहे. मात्र, तेथे अडकलेल्या सर्व भाविकांनी सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्र शासनाने आम्हाला महाराष्ट्रात येण्याची सोय करावी, अशी मदत मागितली आहे. वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. श्री. देवव्रत (राणा) महाराज वासकर यांनी  मुख्यमंत्री ठाकरे, विधान परिषद सभापती नीलम गोºहे  व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.

उत्तर प्रदेशमधून आपल्या गावी परत पाठवावे म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. ते याबाबत  सकारात्मक आहेत. - ह.भ.प. शाम महाराज ननवरे (उखळीकर), पंढरपूर

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPandharpurपंढरपूरUttar Pradeshउत्तर प्रदेश