सोलापूर : आजच्या जमान्यात सायकल दुर्मीळ होत आहे. सगळेच लोक आता मोठ्या गाड्या घेऊन फिरत असतात, पण अलीकडे सायकलचा वापर शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही लोक करतात. निरोगी शरीरासाठी सायकल चालवा, पर्यावरण वाचवा असा संदेश देत अकलूजचा तरूण राहुल माने-देशमुख याने दोन हजार किलोमीटरचा सायकलवरून प्रवास करून तो संदेश सर्वदूर पोहोचविला.
हा प्रवास सायकली सोबत करणे म्हणजे मोठे कठीण काम होते. सकाळी सुरू केलेला प्रवास रात्री उशिरापर्यंत चालू ठेवायचा ठरविले. ठरावीक अंतर एका दिवसात पूर्ण करुन उद्याच्या दिवसाचे शेड्यूल ठरवून मग विश्रांती घ्यायची आणि सकाळी तयार होऊन पुढच्या प्रवासाला निघायचे. हा प्रवास खूप मोठा आहे. या प्रवासादरम्यान ऊन, वारा, पाऊस, थंडी यासारख्या गोष्टीला सामोरे जाऊन मोठमोठ्या नॅशनल हायवेवरून सायकल प्रवास करुन नद्या डोंगर ओलांडून पूर्ण केलेला प्रवास हा प्रेरणा देणारा आहे असे सायकलस्वार सोमनाथ याने लोकमतशी बोलताना सांगितले.
-----------
अकलूज ते केदारनाथ यात्रा...
दररोज सकाळी गावात फेरफटका मारणारे राहुल माने- देशमुख यांनी सायकलवर अकलूज ते केदारनाथ यात्रा करायची ठरवली आणि ती त्यांनी एकट्याने पूर्ण केली. अकलूज ते श्रीक्षेत्र केदारनाथ सायकल यात्रा १४ दिवस, ७ राज्यातून २०७१ किलोमीटरचा प्रवास करून पूर्ण केली.