- विठ्ठल खेळगी पंढरपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी पंढरपुरातून रॅली काढण्यात आली. ३५० फुटांच्या तिरंगा ध्वजाने सर्वांचे लक्ष वेधले. भारत मातेच्या जयघोषाने पंढरीनगरी दुमदुमली. या रॅलीमध्ये पाच हजार विद्यार्थ्यांचा सहभाग होतारॅलीत ३५० फुटांचा तिरंगा ध्वज हातात घेऊन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पंढरी नगरी झांज पथकासह टाळ मृदुंगाच्या गजरात भारत माता की जय, वंदे मातरम यांनी दुमदुमून निघाली. शहरात विविध ठिकाणी या रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी देशभक्तीपर गीत सादर करीत पुष्पवृष्टी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅलीची सुरुवात झाली. ही रॅली छत्रपती शिवाजी चौक, भादुले चौक, नाथ चौक, महाव्दार चौक, कालिका देवी चौक मार्गे येवून छत्रपती शिवाजी चौक येथे समारोप करण्यात आला.