सोलापूर : शहरातील कुमठा नाका रोडवरील संजय नगरात निलगीर झाडांच्यामध्ये पतंग मांजात लटकत होता. ब्राह्मणी घार पक्षी त्याच मार्गावरून उडत असताना त्यात पंख फसले व उलटी लटकली. त्यानंतर वनविभागाच्या प्रयत्नाने ४० फुट उंचीवर पतंगाच्या मांजात अडकलेल्या ब्राम्हणी पक्ष्याची बास्केट गाडीच्या मदतीने सुखरूप सुटका केली.
दरम्यान, पतंगाच्या मांजात अडकलेल्या घटनेची माहिती संजय नगर परिसरातील रहिवासी अजित मात्रे यांनी वनविभागाला कळविली. त्यानंतर पक्षीमित्र प्रविण जेऊरे घटनास्थळी पोहचले. ब्राह्मणी घार झाडांच्या मधील पतंग मांजात फसलेला आढळली. उलटी लटकलेल्या पक्षीची सुटण्यासाठी प्रचंड धडपड सुरू होती. परंतु मांजात आणखी घट्ट आवळत चालला होता. साधारण चाळीस फुट उंचीवर फसलेला ब्राह्मणी घार काढण्याचे प्रयत्न सुरू केले. महापालिकेची बास्केट गाडी बोलावून त्या बास्केटमध्ये बसून पक्ष्यापर्यंत पोहचता आले नाही त्या नंतर लोंबकळत असलेला मांजास हुक लावून खाली खेचण्यात आले अन् सुखरूप सुटका केली.
अन् त्या ब्राम्हणी पक्ष्याने घेतली आकाशात झेप
भिती निर्माण होऊ नये म्हणून पक्षीमित्रांनी पक्ष्याला खाली घेताच कापडाने डोळे झाकले. त्यानंतर त्या पक्ष्याची तपासणी केली. कोणतीही जखम आढळून आली नाही. प्रचंड घाबरलेल्या ब्राह्मणी घार पक्षीस तात्काळ सोडले असता. तो कशाला तरी धडकण्याची शक्यता होती. हा धोका ओळखुन ब्राह्मणी घार पक्षीस एका बॉक्समध्ये बंद ठेवण्यात आले. अर्धातासाने त्याच परिसरात बॉक्स उघडला असता. ब्राह्मणी घार पक्षीने जोरदार आकाशात झेप घेतली.