शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
2
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
3
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
4
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
5
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
6
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
7
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?
8
विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू
10
IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!
11
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
12
अरे बापरे! रेल्वेच ट्रॅफिकमध्ये अडकली? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल; रेल्वेने दिले स्पष्टीकरण
13
SL vs NZ : श्रीलंकेची रन मशीन! Kamindu Mendis ला तोड नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही
14
"लादेन समाजामुळे दहशतवादी बनला", जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान
15
देशात वाढतेय Credit Card डिफॉल्टर्सची संख्या, पाहा Loan घेतल्यानंतर डिफॉल्ट केल्यास काय होतं नुकसान?
16
Pitru Paksha 2024: केवळ श्राद्धविधी केल्याने पितृदोष संपतो का? शास्त्र काय सांगते जाणून घ्या!
17
अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!
18
"माझा साखरपुडा काय लग्नही...", अरबाज पटेलचं स्पष्टीकरण; म्हणाला, 'निक्की बाहेर आल्यावर...'
19
अरे देवा! आयकर विभागाने मजुराला पाठवली तब्बल २ कोटींची नोटीस, घाबरुन 'तो' म्हणतो...
20
मुंबईचा 'संकटमोचक' झाला सज्ज! निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविल्याचा लाडला आनंद

चालत्या मोटरसायकलवरून पडल्याने सोलापुरातील प्रसिद्ध वास्तुतज्ञाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2023 5:19 PM

आकाशवाणी केंद्राजवळ घटना:  एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद

-संताजी शिंदे

सोलापूर : अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील कारखान्यातून घराकडे जात असताना चालत्या मोटर सायकलचा अपघात होऊन, सोलापुरातील उद्योजक व प्रसिद्ध वास्तु तज्ञाचा मृत्यू झाला. 

श्रीनिवास गोपाल येलदी (वय ५३, रा. बोल्ली मंगल कार्यालयजवळ, अशोक चौक, सोलापूर) असे वास्तु तज्ञाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अक्कलकोट एमआयडीसी परिसरातून श्रीनिवास येलदी घराकडे हे मोटारसायकल (क्र-एमएच-१३ डीएल-३६९६) वर घरी जात होते. ते आकाशवाणी केंद्र येथील पाटील पेट्रोलपंपा शेजारी गाडीवरून खाली पडले. त्याच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होता.

उपचार सुरू असताना श्रीनिवास येलदी याचा मृत्यू झाला. याबाबत राजशेखर श्रीनिवास येलदी (वय २८) यांनी २२ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पेालिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल कांबळे हे करीत आहेत. मयत श्रीनिवास येलदी हे विजयनगरातील प्रसिद्ध उद्योजक होते. ते शहरातील प्रसिध्द वास्तुतज्ज्ञ असल्याने त्याचा राज्यभरात सर्वत्र संपर्क होता.

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूर