शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

ऊसाचं बिल आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला मालट्रकनं उडवलं अन् जागीच झाला ठार

By विलास जळकोटकर | Published: June 20, 2023 4:56 PM

ट्रकचालक पसार : माढा तालुक्यातील अकोले शिवारात अपघात

सोलापूर : दहा महिने जीवापाड जपलेला ऊस कारखान्याला घातला. त्याचं बील आणण्यासाठी दुचाकीवरुन चाललेल्या वृद्ध शेतकऱ्याला मालट्रकनं उडवलं आणि काळानं त्यांना दवाखान्याला नेण्याचाही अवधी दिला नाही. ते जागीच गतप्राण झाले. सोमवारी सकाळी १०:३० च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.

चांगदेव नामदेव देशमुख (वय ६५, रा. वांगी नं. १, ता. करमाळा) असे मृत पावलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. यातील मयत शेतकरी चांगदेव नामदेव देशमुख यांनी त्यांच्या शेतामध्ये लागण केलेला ऊस चालू हंग़ामात कारखान्याला घातला होता. त्याचं बिल आणण्यासाठी ते सोमवारी सकाळी वांगी नं. १ या गावाहून (एम. एच. ४५ आर ० ६०२) या बाईकवरुन टेंभुर्णीकडे करमाळा रोडने निघाले होते.

साधारण साडेदहाच्या सुमारास बाईक माढा तालुक्यातील अकोले खुर्दच्या शिवारात आली असताना अचानक समोरुन करमाळ्याहून टेंभुर्णीकडे येणाऱ्या ट्रकचालकाने (के ए २२ सी ३२८३) रोडची स्थिती न पाहता वाहन चालवून दुचाकीस्वार चांगदेव देशमुख यांना धडक दिली. यात बाईकसह चांगदेव रोडवर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि यातच ते जागीच ठार झाले, असे मयताचे पूत्र नागनाथ चांगदेव देशमुख यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियमानुसार गुन्हा नोंदला आहे. तपास हवालदार तांबोळी करीत आहेत.अन् बील घरी पोहोचलंच नाही जीव मात्र गेला

आगामी शेतीसाठीच्या तरतुदीसाठी, संसारोपयोगी गरजांसाठी ऊसाचंव आणावं म्हणून गेलेल्या चांगदेव देशमुख यांना बिल आणण्यासाठी पोहचण्यापूर्वीच ट्रकच्या रुपानं काळ धाऊन आला आणि वाटेतच त्यांना जीव गमावावा लागला. या अकाली मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSolapurसोलापूर