सोलापूर : शेअर ए रिक्षामधून सध्या सर्रासपणे तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक शहर जिल्ह्यात होत आहे. वाहतूक पोलीस प्रतिप्रवासी ५०० रुपयांप्रमाणे दंड आकारतात. रिक्षाचालकांची ओरड होतेय. पेट्रोल, एलपीजीचे दर वाढले असताना त्यावर कोणी बोलत नाही, व्यवसाय कसा करायचा असा सवाल करून लागले आहेत.
सोलापूर शहरात सध्या पेट्रोल, एलपीजी, सीएनजीवर इंधनावर जवळपास १२ रिक्षा चालवल्या जातात. यात एलपीजवर चालणाऱ्या रिक्षा जास्त आहेत. सध्या इंधनाचे दर शंभर रुपयांच्या पुढे आहेत. मीटरप्रमाणे भाडेही परवडत नाही. दरवाढ मागितली तरी दिली जात नाही. नुकतीच झालेली दरवाढही केवळ सहा रुपायांनी वाढवून ती १८ रुपयांपर्यंत केली आहे. त्यातही पूर्वीच्या पहिल्या एक मीटरवरून दीड किलोमीटरपर्यंत वाढ केली आहे. नाइलाजाने अधिकचे प्रवासी घेऊन वाहतूक केली जाते. यावर परिवहन प्राधिकरणानेच दरवाढ करून पर्याय काढावा, अशी रिक्षाचालकांची मागणी आहे.
----
कोंबून प्रवास करणे धोक्याचे
तीन प्रवाशांचा परवाना असताना मधल्या आसनावर चार जण, पुढे चालकाच्या दोन्ही बाजूने दोघे असे सहा जणांना घेऊन प्रवासी वाहतूक होते. ती रिक्षाचालक आणि प्रवाशांच्याही दृष्टीने धोक्याचे आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. अशी वाहतूक जीवघेणीही ठरू शकते, याचा प्रवाशांनीही विचार करावा, असा सूर संजय घोडके, शिवानी शिंदे, अमृत पानसरे आदींनी व्यक्त केला.
-----
प्रति अतिरिक्त प्रवाशांनुसार दंड
१५ ते २० रुपयांच्या प्रवासाठी शेअर रिक्षाच्या नावाखाली रिक्षाचालकांना प्रतिप्रवासी ५०० रुपयांप्रमाणे दंड मोजावा लागतो. पोलिसांच्या मते नियमानुसार प्रवासी भर कारवाईला सामोरे जायचाच प्रश्न येत नाही, तर रिक्षाचालक म्हणतात. पेट्रोलने १०० रुपये पार केले अशावेळी वाहतूक कशी करायची. कसे परवडणार? नुकतीची केलेली दरवाढही केवळ ६ रुपये केली आहे.
----
पुन्हा कारवाई तीव्र होणार
एकीकडे अपघाताची संख्या वाढत आहे. परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या नियमानुसार प्रवासी वाहतूक करणे गरजेचे असताना शेअर ए रिक्षाच्या नावाखाली तीनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक होते. अशावेळी वाहतूक शाखेकडून कारवाई केली जाते. मध्यंतरी शिथिल झालेली कारवाई पुन्हा तीव्र करण्याचे संकेत वाहतूक विभागाने दिले आहेत.
----
शहरात १२ हजार ॲटो रिक्षा
सोलापूर शहरात पूर्वी ५ हजार अधिकृत ॲटो रिक्षा होत्या. नव्याने ७ हजार परमीट मिळाले आहेत. २०१२ पासून दरवाढ झाली नव्हती. मे महिन्यात परिवहन प्राधिकरणाने ॲट रिक्षाचालकांच्या बैठकीत पूर्वीच्या १२ रुपये प्रतिकिलोमीटरवरून आता ६ रुपये वाढ करून ती १८ रुपयांवर नेली आहे. ही दरवाढ तोकडी असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. शेअर ए रिक्षाद्वारे आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करतोय. यासाठी दरवाढ करा, जादा प्रवासी भरण्याचा प्रश्नच येत नाही, असा सवाल रिक्षाचालकांमधून होत आहे.
----