सोलापूर : शेतीच्या कामासाठी दुचाकीवरुन डबलीसीट निघालेल्या दोघांना समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वारानं धडक देऊन उडवल्यानं एकाचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. दुसऱ्या महिला रुग्णावर शासकीय रुग्णालयात उपचर सुरु आहेत. सोलापूर-पुणे हायवेवरील वडवळ-रामणहिंगणी रोडवर सोमवारी सकाळी ७३० च्या सुमारास हा अपघात झाला. आप्पासाहेब जनार्धन मोरे (वय- ५२, रा. वडवळ, ता. मोहोळ) असे मृत्य पावलेल्या मजुराचे नाव आहे. तर कोमल बालाजी मोरे (वय- २६, रा. वडवळ) या महिलेवर उपचार सुरु आहेत.
सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घरातून यातील मयत आप्पासाहेब जनार्धन मोरे व कोमल बालाजी मोरे हे दुचाकीवरुन वडवळहू रामहिंगणी रोडवरुन शेतीच्या कामासाठी निघाले होते. त्यांची दुचाकी मच्छिंद्र वाघमतोडे यांच्या शेताजवळ आली असता समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वारानं (एम एच २० एएम ४१५२) त्यांना धडक दिली. यात दोघेही खाली पडून गंभीर जखमी झाले. यामध्ये आप्पासाहेब याच्या डोक्याला आणि पायाला मार लागून रस्त्यावर रक्त वाहिलं.
अपघाताचे वृत्त समजताच जखमी आप्पासाहेब याचा चुलतभाऊ बाबुराव याला कळवल्याने त्यांने तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. येथे डॉक्टरांनी तपासले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याने सांगितले. याच अपघातातील दुचाकीवर मागे बसलेल्या कोमल यांच्यावर उपचार सुरु आहेत.