सोलापूर - शहरातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आयुक्त शीतल तेली-उगले यांच्याकडे केली आहे. दरम्यान, अनधिकृत बांधकामांवर त्वरित कारवाई करण्याच्या मागणीसाठी कामगार सेनेचे पदाधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या पूनम गेटसमोर चक्री उपोषण सुरू आहे. जोपर्यंत वरील मागण्याची पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत चक्री उपोषण करणार आहोत. याची गंभीर नोंद घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, प्रलंबित रमाई आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना तत्काळ अनुदान मंजूर १ तसेच शहररहीत खासगी जागेवरील अधिकृत झोपडपट्ट्या करण्यात यावे. मध्ये ‘खोई’ आवास योजनेची तत्काळ अंमलबजावणी करा, ५ ब्रास मोफत वाळू रमाई आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मिळावी व त्यांची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांबाबत उपोषण सुरू आहे.
रस्त्यावरच बांधकामे थाटली..किडवाई चौक जेलरोड लगत, पुकाळे दूध डेअरीलगत बागवान अपार्टमेंट, पद्मशाली चौक, ग्रामीण पोलिस मुख्यालय लगत एका हॉस्पिटलचे बांधकाम, तेलंगी पाच्छा पेठ नाल्याच्या लगत बेकरी या ठिकाणी झालेल्या अपार्टमेंट बांधकामाचे चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कामगार सेनेने केली आहे.