विलास जळकोटकर
सोलापूर : मूळचे सोलापूरचे आणि सध्या नांदेड येथे पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आनंद मळाळे यांनी शनिवारी पहाटे सोलापुरातील स्वतःच्या कुमठा नाका येथील सम्राट चौकातील राहत्या घरी रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर आनंद मळाळे नांदेड येथे कार्यरत होते. गेल्या महिन्याभरापासून आनंद मळाळे हे आजारी रजेवर सोलापूरला आपल्या घरी आले होते. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास आनंद मळाळे यांनी घराच्या अंगणामध्ये स्वतःजवळच्या रिव्हॉल्व्हरने डोक्यामध्ये गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली.
संबंधीत अधिकारी मळाळे हे बिलोली येथे पोलिस दलात एपीआय पदावर कार्यरत होते. त्याचा एक दीड महिन्यापूर्वी ड्यूटीवर असताना अपघात झाला होता. डोक्याला जबर मार होता. नांदेडला ते ॲडमिट होते, अशी माहिती मिळतेय. सिव्हील मध्ये मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांना नकार दिल्याने सिव्हील मध्ये गर्दी झाल्याचे समजते. मळाळे हे सध्या नांदेड जिल्ह्यातील बिलोली पोलीस ठाण्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. ते मूळचे उस्मानाबादचे असून, सोलापूर येथे वाहतूक शाखेत पोलीस उपिनरीक्षक म्हणून कार्यरत होते. नांदेड येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर त्यांची पद्दोन्वतीवर बदली झाली होती.वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या?
संबंधीत घटना ही वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून केली असल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. त्याच्याकडे सुसाईड नोटही असल्याचे समजते. घटनेच्या वेळी त्यांची पत्नी त्यांचा शोध घेत होती मात्र ते घराच्या बाहेर मृतावस्थेत पडले होते. घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजू मोरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.