- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २५ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा काढण्यात येते, यंदाचे २६ वे वर्ष असून, श्री स्वामी समर्थ महाराज की जय... ! च्या जयघोषात गुरुवारी श्रोक्षेत्र अक्कलकोट येथून प्रस्थान झाली.
दरम्यान या परिक्रमेचा शुभारंभ देवस्थानचे मुख्य पुरोहित प.पू.वे.शा.स.मोहनराव गोविंदराव पुजारी यांचे चिरंजीव मंदार पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुरोहित प.पू अण्णू महाराज पुजारी आणि श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते श्रींच्या पदुकाचे पूजन करून करण्यात आले. महाप्रसादालयात पादुका पूजन, शमीविघ्नेश मंदिर, श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, समाधी मठ, श्री खंडोबा मंदिर येथील पूजनानंतर परिक्रमा हि सोलापूर कडे मार्गस्थ झाली.
याप्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामकाका मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, राजेंद्र लिंबीतोटे, लाला राठोड, सुरेशचंद्र सुर्यवंशी, सी.ए.ओंकारेश्वर उटगे, लक्ष्मण पाटील, आप्पा हंचाटे, शितल फुटाणे, राजाभाऊ नवले, सनी सोनटक्के, बिल्वराज सुर्यवंशी, मुख्य पालखी संयोजक संतोष भोसले, मनोज निकम, अरविंद शिंदे, प्रवीण घाडगे, निखिल पाटील, प्रकाश शिंदे, गोटू माने, अंकुश चौगुले, भरत राजेगावकर, मनोज इंगोले, गोविंदराव शिंदे, बाळासाहेब घाडगे, अमित थोरात, वैभव मोरे, श्रीकांत झिपरे, संजय गोंडाळ, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, विश्वंभर पुजारी, रामचंद्रराव घाडगे, पिटू शिंदे, आकाश गडकरी, अमोल पोतदार, योगेश पवार, सौरभ मोरे, आकाश सुर्यवंशी, प्रसाद मोरे, किरण जाधव, प्रथमेश पवार, महेश दणके, टिंकू पाटील, रोहित निंबाळकर, सिद्धेश्वर मोरे, राजाभाऊ पंजाबी, सागर गोंडाळ, स्वामीनाथ गुरव, श्रीधर गुरव, वैजीनाथ मुकडे, प्रशांत मोरे, अंकुश केत, गणेश फडतरे, गोपी फडतरे, पिंटू दोडमणी, सुमित कल्याणी, दिलीप कदम, सिद्धाराम कल्याणी, मुन्ना कोल्हे, पप्पू कोल्हे, शहाजीबापू यादव, महादेव अनगले, प्रसाद हुल्ले, राजू पवार, रमेश हेगडे, दत्ता माने, मल्लिकार्जुन बिराजदार, अनिल बिराजदार, श्रीनिवास गवंडी, बाळासाहेब पोळ, नामा भोसले, कुमार सलबत्ते, धानप्पा उमदी, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, एस.के.स्वामी, यांच्यासह सेवेकरी कर्मचारी वृंद उपस्थित होते.
सदर पालखी पादुका ६ महिने महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा राज्यासह ८ मे २०२३ रोजी तीर्थक्षेत्र नगरीत विसावणार असल्याचे माहिती न्यासाचे पालखी परीक्रामाचे मुख्य संयोजक संतोष भोसले यांनी दिली आहे. सदराची पालखी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, बृहन मुंबई, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या विभागातून जाणार आहे. न्यासाच्या वतीने अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-पादुकांचे दर्शन व सेवा संबंध महाराष्ट्रासह अन्य राज्यातील गावोगावी असलेल्या स्वामी भक्तांना दर्शन करता यावे यासाठी श्री स्वामींच्या पालखी परीक्रमेचे आयोजन केले आहे. तसेच अन्य कारणास्तव दूरवरच्या आबाल वृद्ध, महिला स्वामी भक्तांना श्रींच्या दर्शनास्तव इच्छा असूनही स्वामींच्या मूळ स्थानी अक्कलकोट येथे येता येत नांही आशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामीच त्यांच्या गावी येत आहे.