सोलापूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी अभिनव संकल्पना जवळच्या पेालिस ठाण्यास किंवा पोलिस अधीक्षक कार्यालयास द्यावी असे आवाहन सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनेनुसार सर्व सण पर्यावरणपूरक साजरे करण्याबाबत सुचना निर्गमित केल्या आहेत. या अनुषंगाने यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करणे, त्याकरिता आवश्यक तेवढ्या कृत्रिम तलावांची निर्मिती करणे, सजावटीतील साहित्य, पूजेतील निर्माल्य, नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जित न करता निर्माल्यासाठी मंगल कलश तयार करणे, त्याचबरोबर सजावटीतील साहित्याची विल्हेवाट घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार शास्त्रोक्त पध्दतीने लावण्यात यावी, तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ज्या अभिनव संकल्पना राबविल्या जातील त्याची माहिती जवळच्या पोलिस ठाणे किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयास द्यावी असे आवाहन सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केले आहे.