शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

महिला न्यायाधीशांनी कोर्टाच्या प्रवेशद्वासमोर दिला दिव्यांग व्हीलचेअरवरील महिलेला न्याय

By विलास जळकोटकर | Published: June 07, 2023 9:33 PM

मोटार अपघात खटला मध्यस्थीनं मिटवला, रोख अन् धनादेशानं भरपाई

सोलापूर : लोकशाहीच्या प्रमूख स्तंभापैकी एक असलेल्या न्यायमंदिरात बुधवारी एक सुखद घटना घडली. जिल्हा न्यायाधीश रेखा पांढरे यांनी चक्क न्यायपीठावरुन उतरुन न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन मोटार अपघातातील खटला मध्यस्थीनं निकाली काढला. व्हीलचेअवरील असहाय्य महिलेला २ लाख ६० हजार रुपयांची मदत मिळवून दिली.

न्यायमंदिरणातील अशी दुर्मिळ घटना सोलापूरच्या जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये घडली. त्याचे असे झाले, सोलापूरच्या जिल्हा न्यायालयात अर्जदार मंन्चली विरुद्ध समाधान रासकर हा मोटार अपघातातील नुकसानभरपाईचा अर्ज (१४७/ २०२२) जिल्हा न्यायाधीश आय.ए. नझीर यांच्या न्यायालयामध्ये प्रलंबित होता. न्यायालयाने मध्यस्थीसाठी सदरचा अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे सोपविला होता.

या प्रकरणाचे स्वरुप लक्षात घेता तो १० फेब्रुवारी २०२२ रोजी घडलेल्या अपघाताशी निगडीत होता. हा अपघात कुर्डू शिवारातील आदीलक्ष्मी मंदिराजवळ सकाळी ९ च्या सुमारास घडला होता. या घटनेमध्ये वाहनचालकाने अर्जदार मंन्चली या तिच्या पतीसमवेत दुचाकीवरुन प्रवास करीत होत्या. यात टँकरचालकाने धडक दिली. यामुळे अर्जदार मंन्चली यांच्या पायाला गंभीर जखम होऊन त्यांना अपंगत्व आले.

या प्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात मोटार वाहन अधिनियमान्वये गुन्हा दाखल होता. वैद्यकीय उपचारानंतर मंन्चली यांनी कायदेशीर सल्लागारामार्फत नुकसान भरपाईसाठी अर्ज केला होता. हा अर्ज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव नरेंद्र जोशी यांनी मध्यस्थीसाठी जिल्हा न्यायाधीश रेखा पांढरे यांच्याकडे वर्ग केला. अर्जदार व टँकरचालक यांच्यात मध्यस्थी घडवून तडजोडीची रक्कम न्यायालयासमोरील प्रवेशद्वारासमोर दिव्यांग महिलेला दिली. ही दुर्मिळ घटना सोलापूरच्या न्यायालयात वकील, पक्षकारांनी अनुभवली. या प्रकरणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे लिपिक सुनीता चोपडे, विजय माळवदकर, सचिन वडतिले, रहिम शेख यांनी सहकार्य केले.चर्चेत मध्यथी ठरली यशस्वी

या प्रकरणात अर्जदार मंन्चली त्यांचे वकील व्ही. आर. कोन्हाळे आणि टँकर मालक नागेश खटके उपस्थित होते. न्यायाधीशांनी उभयंतासमवेत मध्यस्थीसाठी मार्गदर्शन करुन तडजोडीचे प्रयत्न केले. चर्चेनंतर टँकरचालक आणि जखमी अर्जदार मंन्चली यांच्यात तडजोड केली आणि मध्यस्थी यशस्वी झाली.अन् न्यायपीठावरुन प्रवेशद्वारासमोर आल्या

या चर्चेनंतर टँकरचालकाने लागलीच तडजोडीच्या रकमेचा धनादेश २ लाखाचा धनादेश आणि रोख ६० हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. अर्जदारानेही तयारी दर्शविली. अर्जदार या व्हीलचेअरवर असल्याने मध्यस्थीची ही प्रक्रिया जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर पार पडली. जिल्हा न्यायाधीश पांढरे यांनी प्रकरणातील तथ्य आणि दिव्यांगाप्रती संवेदनशीलता जाणून न्यायपीठावरुन उतरुन न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर आल्या आणि तडजोडीची रक्कम व धनादेश त्यांच्या उपस्थितीत व्हीलचेअरवरील महिलेला प्रदान केली.

टॅग्स :Solapurसोलापूर