अकलूज : माळेवाडी- अकलूज येथे एकाच वेळी दोन वधुंशी लग्न केल्याने अकलूज पोलिस ठाण्यात तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी वरासह दोन्ही वधू व त्यांची आई स्वत: हजर होऊन पोलिसांकडून नोटीस स्वीकारून पोलीस तपासात सहकार्य करण्याचे मान्य केले.
माळेवाडी येथे शुक्रवार, दि. २ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता रिंकी व पिंकी मिलिंद पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींशी अतुल आवताडे या युवकाने विवाह केला. त्यानंतर माळेवाडीतीलच राहुल फुले यांच्या तक्रारीवर अतुल आवताडे याच्यावर अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
अकलूजचे लग्न: तरुणावरच गुन्हा का? दोन जुळ्या बहिणींवर का नाही? कुठे फसला...
या गुन्ह्यात रविवारी दुपारी अतुलबरोबर रिंकी व पिंकी आणि त्यांची आई धनश्री मिलिंद पाडगावकर हे ठाणे अंमलदार बकल यांच्यासमोर स्वतःहून हजर झाले. बकल यांनी अतुल यास गुन्ह्याची नोटीस देऊन अकलूज पोलिसांनी वेळोवेळी तपासासाठी बोलविल्यानंतर हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे बजावले आहे. उपस्थित सर्वांनीच सहमती दर्शवली. त्यानंतर चौघेही मुंबईला रवाना झाले. त्यानंतर अतुलने दोन बायकांसह संसारही सुरु केल्याचे सांगितले जात आहे.
सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ-
अकलूजमध्ये पार पडलेल्या विवाह सोहळ्याचे फोटो व चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाला. यातून चर्चा होत मिम्सचा अक्षरश: धुमाकूळ घातला. काहींनी आम्हाला एक वधू मिळत नाही, म्हणून खंत व्यक्त केली, तर काहींनी एकीलाच सांभाळणं कठीण होत असल्याचे सांगितले. काहींनी तर आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे असेही मत मांडले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"