शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
4
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
6
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
7
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
8
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
9
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
10
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
11
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
12
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
13
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
14
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
15
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
16
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
17
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
18
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
19
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
20
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!

कल्याणनगर परिसरात तरुणाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

By विलास जळकोटकर | Published: July 01, 2024 1:09 PM

कल्याणनगर परिसरातील मोकळ्या मैदानात एका तरुणाचा दगडानं ठेचून खून करण्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.

सोलापूर : कल्याणनगर परिसरातील मोकळ्या मैदानात एका तरुणाचा दगडानं ठेचून खून करण्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. विनायक कामण्णा हक्के (वय- २९, सध्या रा. कल्याण नगर भाग १, मूळ जामगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे. 

घटनेची खबर मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार सदरची घटना मध्यरात्री नंतर घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा प्रकार नेमका कोणत्या कारणामुळे झाला असावा याचा पोलीस शोध घेत आहे. घटनास्थळी फॉरेन्सिट लॅब, श्वानपथकास पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळावरच पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सहा. पोलीस आयुक्त अजय परमार, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्यासह पोलीस पथकांकडून शोध सुरु आहे.

महिन्यापूर्वीही मारहाणमहिन्यापूर्वी खून झालेल्या या तरुणाला जमावाकडून मध्यरात्री १२:३० च्या सुमारास मारहाण झाली होती. तो रस्त्याच्या कडेला थांबला होता. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी सिव्हील पोलीस चौकीतील नोंदीवरुन निदर्शनास येत आहे.

नवीन कलमानुसार होणार खुनाचा गुन्हा१ जुलैपासून आयपीसी ३०२ ऐवजी बीएनएस कलम १०३ अन्वये गुन्हा गुन्हा नोंद होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी