सोलापूर : बार्शी शहरातील तेलगिरणी चौकात चालत असलेल्या वेश्या व्यवसाय (कुंटनखान्यावर) ग्रामीण पोलीसांची अचानकपणे धाड टाकली़ या धाडीत सहा मुलींची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी पाच महिलांना पोलीसांना ताब्यात घेतले आहे़ दरम्यान, पोलीस अधिक्षक एस विरेश प्रभू यांच्या आदेशाने बार्शी शहरातील तेलगिरणी येथे चालत असलेल्या वेश्या व्यवसायावर धाड टाकली़ या धाडीत लक्ष्मीबाई यशवंतराव जाधव (वय ६८ रा़ घर नं ३४६९ कुंभार बोळ, तेलगिरणी चौक, बार्शी), कांचन रामचंद्र सुपेकर, सिंधू दगडू मांढरे, आशा बिरोबा वैरागे, जैतुन आप्पालाल शेख या दलाल महिलांविरूध्द बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणी सहा़ पोलीस निरीक्षक प्रकाश व्यंकटराव वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे़ ही धाड पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे, पोहेकॉ अंकुश वसंत मोरे, मिलिंद सुबराव कांबळे, अमृत रोहिदास खेडकर, अमोल अंगद माने, अभिजित दिगंबर लामजाणे, पांडूरंग दिगंबर केंद्रे, अमोल तुकाराम जाधव, स्वप्नील संभाजी गायकवाड, कविता पुंडलिक पुजारी, रेश्मा चंद्रसेन विश्वकर्मा, भारती कानबा वाठोरे, पंढरीनाथ बोधनापोड यांनी बजावली़
बार्शीत कुंटणखान्यावर धाड, सहा मुलींची सुटका, पाच महिलांना घेतले ताब्यात
By admin | Published: March 31, 2017 1:50 PM