सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्यासाठी साडेसात कोटी रुपये खर्चाचे ४ लाख ३५ हजार मास्कसह सात प्रकाराच्या साहित्यांची मागणी झेडपीचे शिक्षण सभापती दिलीप चव्हाण यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठया प्रमाणावर वाढत आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. राज्य शासनाने शाळा सुरू करण्याचे संकेत दिलेले आहेत. याप्रमाणे सन २०२०-२१ मधील शैक्षणिक वर्ष सुरू करायचे झाल्यास शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.
जिल्हयात झेडपीच्या २८०० शाळा आहेत. या शाळांमधून २ लाख ७ हजार विद्यार्थी विद्यार्जन व ९ हजार ६४२ इतके शिक्षक त्यांच्यासाठी ज्ञानर्जनाचे काम करतात. त्याप्रमाणे या सर्वांच्या रक्षणासाठी जिल्हा नियोजनमधून खालील साहित्य खरेदी करून मिळावे. थ्री लेअर कापडी मास्क: ४ लाख ३५ हजार, फेस शील्ड कव्हर: २ लाख १७ हजार, डिजीटल थर्मल स्कॅनर: २८00, पल्स अॅक्सीमीटर: २८00, हॅन्ड सॅनीटायझर, पाच लिटरचे एक कॅन: २८00, फुट आॅपरेटेड हॅन्ड सॅनीटायझर: ५ हजार ६00. लिक्वीड हॅडवॉशसह डिस्प्रेशनर बॉटल: ५६00.
साडेसात कोटीचा खर्चझेडपीच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी गरीब आहेत. त्यामुळे कोरोणापासून बचाव करणारे साहित्य घेण्याची त्यांची ऐपत नाही. त्यामुळे कोरोना विषाणू संसगार्पासुन त्यांचा बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७ कोटी ५0 लाखाचा निधी द्यावा असा प्रस्ताव दिल्याचे शिक्षण सभापती दिलीप चव्हाण यांनी सांगितले.