सुरेश कृष्णाप्पा मोदे यांचे आठ दिवसापूर्वी एक चारचाकी गाडी सहीत अपहरण केले होते. या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात राजाभाऊ इंगळे (वय ५५ रा. छोटेवाडी, ता. माजलगाव, जि. बीड) व त्याच्या साथदारांवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्हयातील आरोपी अपहरण केलेल्या व्यक्तींना घेवून बीड, उस्मानाबाद, सोलापूर जिल्हयात घेवून फिरत आहेत. ही माहिती पंढरपूर पोलिसांना मिळाली.
उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरूण पवार यांनी तीन पथके तयार केली. या पथकामध्ये सहा. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, मिठू जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत, पवार यांचा सहभाग होता.
या पथकानी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचला. राजाभाऊ इंगळे याला अपहरण केलेल्या व्यक्तीस गाडीसह ताब्यात घेतले. सुरेश कृष्णाप्पा मोदे यांची सुटका केली.
आणखी लोकांचा शोध सुरू
सुरेश कृष्णाप्पा मोदे या व्यापाऱ्यांचे अपहरण झाले होते. त्यांची सुटका केली तर या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या राजाभाऊ इंगळेला हिवरखेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांच्याकडे हस्तांतरण केले आहे. या अपहरण प्रकरणात आणखी किती लोक आहेत. याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे प्रशांत कदम यांनी सांगितले.