मंगळवेढा/लोकमत न्युज नेटवर्क
सध्या साखर कारखाने सुरू झाले असून ऊसतोडणी उचलीवरून वादाचे प्रकार सूरु झाले आहेत. हाजापूर ( ता.& मंगळवेढा) येथे ऊसतोडणी उचल वरून वादंग झाले आहे यामध्ये एका महिलेच्या पतीला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून अपहरण केल्याची तक्रार मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दरम्यान या प्रकरणी तानाजी मारूती पांढरे (रा. पांढरेवाडी ता. जत जि सांगली ) व अन्य अज्ञात दोघे या तिघाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
यातील फिर्यादी वैशाली दिनकर देवकते (वय २७ वर्षे रा. हाजापूर) ही अपहरणकर्त्याची पत्नी असून दि. २० रोजी फिर्यादी व तिचा पती दिनकर देवकते (वय ३४ वर्षे) व मुलगी (वय ९ वर्षे) असे सर्वजण घरासमोर बसले असताना ओळखीचे आरोपी तानाजी मारूती पांढरे व त्यांच्या सोबत अन्य अज्ञात दोघे असे तिघेजण मिळून त्यांचे बुलेट गाडीवर घरी आले. त्या तिघा आरोपीनी फिर्यादीचे पती यांच्यामध्ये कोणतातरी व्यवहारावरून वाद सुरू झाला होता. फिर्यादीने या वादाबाबत पतीकडून माहिती घेतली असता ऊसटोळी कामगार चांगले आहेत का ? याबाबत त्यांना उचल स्वरूपात पैसे दिले होते. पैसे घेवूनही कामगार कामावर गेले नाहीत या कारणास्तव फिर्यादीच्या पतीला आरोपी जबाबदार धरू लागले असल्याचे पतीने पत्नीस सांगितले.
दरम्यान तदनंतर फिर्यादीच्या पतीला आरोपीने बळजबरीने बुलेटवर घेवून गेले. फिर्यादीने पतीशी अनेकवेळा मोबाईलवरून संपर्क केला मात्र आरोपीने संपर्क होवू दिला नाही. काही कालावधीनंतर फोन बंद लागत असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.