शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

अब्दुल सत्तारांनी वारकऱ्यांना घातले साकडे; काय आहे नेमकी बातमी ? वाचा सविस्तर

By appasaheb.patil | Published: November 04, 2022 4:43 PM

पंढरपुरात झाली प्रबोधनपर बैठक

सोलापूर/ पंढरपूर : वारकरी संप्रदायाने गावोगावी होणाऱ्या भजन कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाद्वारे समाजाला जागृत करण्याचे काम केले. यामुळे समाजातील अनेकांचे संसार सुखी झाले आहेत. याच माध्यमातून शेतकऱ्यांचेही प्रबोधन केले तर शेतकरी कधीही आत्महत्या करणार नाही. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे दिली.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत वारकरी संप्रदायातील वारकरी व फडकरी समवेत आयोजित प्रबोधनपर बैठकीत ते बोलत होते. संत तुकाराम भवन येथे आयोजित या बैठकीस आमदार डॉ. बालाजी किणीकर, बापूसाहेब देहुकर, गणेश महाराज शिंदे, विठ्ठल पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषि अधिकारी आर. एन. कांबळे, सर्जेराव तळेकर यांच्यासह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, वारकरी, फडकरी यांच्या प्रत्येक शब्दाला समाजात मान असून, समाजाला भजन, कीर्तनाच्या माध्यमातून जागृत करण्याचे काम ते करतात. शेत पिकांमुळे नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी झाला तर आत्महत्त्या हा पर्याय नाही. राज्याचे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांचे मंत्री आहेत. मागील आठवड्यात नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध विकास योजना आणत आहे, शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेवून तसेच विविध आधुनिक कृषि तंत्राचा वापर करून आपली प्रगती करावी. शेतकरी आत्महत्या करणार नाही, याबाबत वारकरी, फडकरी यांनी पुढाकार घेऊन समाज प्रबोधन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून, राज्य व केंद्र सरकारकडून भरीव मदत करण्यात येणार आहे. नुकसानीची अंतिम आकडेवारी चार दिवसात हाती येईल. ३३ टक्के पाऊस झाला असेल त्या ठिकाणचा देखील पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शेतीसाठी १२ तास वीजपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. निसर्गाच्या लहरीपणामुळे नैसर्गिक संकटे आली तर योग्य नुकसान भरपाई देऊ, कृषि मालाला चांगला व योग्य दर देण्याचा प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.

बापूसाहेब देहूकर म्हणाले, शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची नाही, हे संत तुकाराम महाराज यांनी चारशे वर्षांपूर्वी सांगितले आहे. समुद्राचे पाणी वाढत नाही, दुष्काळ पडला म्हणून कमी होत नाही, हे शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवावे. परंतु, परिस्थिती शेतकऱ्यांना हतबल करते, त्यामुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होतो. सध्याचे शासन हे शेतकऱ्यांची काळजी घेणारे शासन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीAbdul Sattarअब्दुल सत्तारFarmerशेतकरीagricultureशेतीmahavitaranमहावितरण