प्रभू पुजारी
सोलापूर : आयोध्येमध्ये ५ आॅगस्ट रोजी पंतप्रधान आणि मर्यादित भाविकांच्या उपस्थित होणाºया श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पुळूज (ता़ पंढरपूर) आणि किणी (ता़ अक्कलकोट) या दोन्ही ठिकाणच्या खडकावरही अभिषेक केला जाणार आहे.
पुळूज येथील भीमा नदीपात्रात आणि किणी येथील बोरी नदीकाठावर श्रीरामांचा पदस्पर्श लाभलेला आहे़ त्यामुळे त्या ठिकाणांना तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, अशी मागणी रामभक्तांमधून होत आहे़ शिवाय या दोन्ही ठिकाणी रामनवमीचे औचित्य साधून अभिषेक, भजन, पारायण हे धार्मिक कार्यक्रम होतात़ शिवाय त्या दिवशी अनेक रामभक्तांची दर्शनासाठी गर्दी होते़ पुळूज येथील भीमा नदीपात्रात पाणी असल्याने भाविकांना दर्शनासाठी अडचण निर्माण होते.
पुळूज भीमा नदीपात्रात श्रीरामाचे मंदिर असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे़ पात्रात आजही पाषाण, शिळा आढळतात़ या ठिकाणाला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिल्यास श्रीरामांचे मंदिर उभारावे अशी भक्तांची मागणी आहे.- परशुराम कोरे,इतिहास अभ्यासक, पुळूज
किणी येथील बोरी नदीकाठावर श्रीरामाचे पदस्पर्श झाले आहे़ त्यामुळे या ठिकाणी मंदिर असून रामनवमीनिमित्त उत्तर प्रदेशातील रामभक्त व पंचक्रोशीतील भाविक हा उत्सव साजरा करतात़ - अशोक रामशेट्टी, ग्रामस्थ, किणी.
किणीच्या पदस्पर्शाचा उल्लेख श्रीराम सांस्कृतिक शोध संस्थानच्या यादीत आहे़ पुळूजचाही या यादीत समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत़ - नितीन अणवेकर, इतिहास अभ्यासक