सोलापूर दि ११ : ५० हजार रूपयांची लाच स्वीकारताना अकलूज (ता़ माळशिरस) येथील पोलीस उपनिरीक्षकास पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़ ही कारवाई गुरूवार ११ जानेवारी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास अकलूज पोलीस ठाण्यात केली़ राजेंद्र देवीदास राठोड (वय २८ रा़ उदयसिंग चौक, अकलूज, )असे लाच स्वीकारणाºया पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे़ राजेंद्र राठोड हे अकलूज पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत़ तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांवर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्यात मदत करून जामीन करण्यासाठी व दोषारोपपत्रात मदत करून लवकर पाठविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी लाचेची मागणी केली होती़ याबाबत तक्रारदारांनी तक्रार केल्यानंतर त्याबाबत ८ जानेवारी २०१८ रोजी तपासणी करण्यात आली़ त्यानंतर गुरूवार ११ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी ती स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधकाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़ ही कारवाई पोलीस निरीक्षक अर्चना बोदडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक शिर्के यांच्या पथकाने केली़ याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याचे सांगितले़
५० हजाराची लाच स्वीकारताना अकलूज येथील पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडले, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 5:43 PM
५० हजार रूपयांची लाच स्वीकारताना अकलूज (ता़ माळशिरस) येथील पोलीस उपनिरीक्षकास पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़
ठळक मुद्दे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड यांनी ५० हजार रूपये लाचेची मागणी केली होती़याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू