आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५ : प्रस्तावासोबतची मुळ कागदपत्रे परत देण्यासाठी ५०० रूपयांची लाच स्वीकारताना सोलापूर जिल्हा परिषदेचा लिपीक शामल सायण्णा आढकूल (वय ४६ रा़ ११/६३ उजनी कॉलनी, सोलापूर) यास सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़ दरम्यान, तक्रारदार यांनी आंतरजातीय विवाह केला होता़ आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना अंतर्गत ५० हजार रूपयांचे अनुदान मिळविण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केला होता़ त्यांना मार्च २०१७ मध्ये अनुदान मिळाले़ मात्र प्रस्तावासोबतची मुळ कागदपत्र परत देण्यासाठी शामल आढकुल यांनी लाचेची मागणी केली होती़ हीच लाचेची ५०० रूपये रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर पथकाने रंगेहाथ पकडले़ ही कारवाई उपअधिक्षक अरूण देवकर, पोलीस निरीक्षक साळुंखे, सिद यांच्या टिमने केली़
५०० रूपयांची लाच स्वीकारताना सोलापूर जि़प़ चा लिपीक अटकेत
By admin | Published: May 05, 2017 6:10 PM