शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

पाच हजाराची लाच स्वीकारताना पोलीस कॉन्स्टेबल, विद्युत निरीक्षकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 1:15 PM

सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

ठळक मुद्दे- सोलापूर जिल्ह्यात लाचखोरांची संख्या वाढली- महसूल, पोलीस प्रशासनातील, जिल्हा परिषदेमधील अधिकाºयांची संख्या लाच स्वीकारण्यात अधिक- सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सर्तक

सोलापूर : परमीट रूमचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठवण्यासाठी पाच हजारांची लाच मागणाºया पोलीस कॉन्स्टेबलला व विद्युत विभाग पुणे येथून प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी, पाच हजारांची मागणी करणाºया विद्युत निरीक्षकाला एकाच दिवशी लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 

तक्रारदाराने बीअर-बार परमीट रूमचा परवाना मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव बार्शी पोलीस ठाण्यातून जिल्हा विशेष शाखा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकडे पाठविण्यात आला होता. प्रस्तावाचा अहवाल अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांना पाठवण्यासाठी जिल्हा विशेष शाखेतील पोलीस शिपाई युवराज महादेव कुंभार (वय-२९) यांनी ५ हजार रूपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली, त्यानुसार सोमवारी कार्यालयात सापळा रचण्यात आला.

तक्रारदार युवराज कुंभार यांची भेट घेऊन ५ हजारांची रक्कम देताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दुसºया कारवाईत तक्रारदार याने इलेक्ट्रीक आयटीआयचा कोर्स केला आहे. त्याची नोंदणी करून परवाना मिळवण्यासठी सोलापुरातील विद्युत निरीक्षक कार्यालयात गेला होता. विद्युत निरीक्षक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक कैलास दिगंबर मिसाळ (वय-४५) याने ७ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाच्या अधिकाºयाने तक्रारदारास सोमवारी कैलास मिसाळ याची भेट घेऊन तडजोडीने पाच हजार रूपये देण्यास सांगितले. 

कैलास मिसाळ याने पाच हजार रूपये घेण्याची तयारी दर्शवून ती स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या कर्मचाºयांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो पुणेचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अपर पोलीस अधीक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अजितकुमार जाधव, पोलीस निरीक्षक कविता मुसळे, सहायक पोलीस उप-निरीक्षक निलकंठ जाधवर, महिला पोलीस नाईक अर्चना स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल निलेश शिरूर, प्रफुल्ल जानराव, शाम सुरवसे यांनी पार पाडली आहे. 

लाचेची मागणी होत असल्यास संपर्क साधा..- शहर व जिल्ह्यात कोणत्याही शासकीय कार्यालयात किंवा शासनाचे अनुदान घेणारे लोकसेवक जर कामाच्या मोबदल्यात पैशाची मागणी करीत असतील, काम करताना अडथळा आणून त्रास देण्याचा प्रयत्न करीत असतील तर लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अजितकुमार जाधव यांनी केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस