अधिक माहिती अशी की, आरोपी नदीम शाखीर खान याने अक्कलकोट शास्त्री गल्ली येथील फिर्यादी वसीम महिबूब बागवान यांच्या बरोबर पार्टनरमध्ये साडी विक्रीचा व्यवसाय केला. ग्रामीण भागात फिरून व्यवसाय करीत होता. सुरुवातीला विश्वास संपादन केला. दोन वर्षे सुरळीतपणे व्यवसाय करून दि.८ एप्रिल रोजी १ लाख ४० हजार रुपयांच्या साड्या घेऊन पलायन केले होते. या घटनेची माहिती मिळताच फिर्यादी यांनी अक्कलकोट येथील उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी फरार होता. पोलीस शोध घेत होते. मात्र, तो आढळून येत नव्हता. अखेर दि.२१ सप्टेंबर रोजी रिसोड झोपडपट्टी, ता. लोणी फाटा, जि. वाशिम येथे पोलिसांनी सापळा रचून अटक त्याला केली. दि.२२ सप्टेंबर रोजी येथील कोर्टासमोर त्याला उभे केले असता, एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेश येथील बारबंकी जिल्ह्यातील आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, असपाक मियावाले, प्रमोद शिंपाळे यांनी केली.
दीड लाखाच्या साड्या घेऊन पळालेल्या आरोपीला वाशिममध्ये पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:25 AM