सोलापूर : दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व तक्रारदाराचा गुन्हा नोंद करण्यासाठी ८ हजाराची लाच मागणाºया दोन पोलीस अधिकाºयांना सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़
जेलरोड पोलीस स्टेशन अंकीत अशोक चौक पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक केरू रामचंद्र जाधव (वय ५७, रा़ ४१/२१२ बुधवार पेठ, सोलापूर) व पोलीस नाईक संतोष रामचंद्र चव्हाण (वय ३४, रा़ कवठे, ता़ उ़ सोलापूर) असे लाच स्वीकारणाºया दोघांची नावे आहेत़
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्याविरूध्द जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम ३२४, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे़ लाच घेणारे पोलीस उपनिरीक्षक हे अशोक चौकीचे सहा़ फौजदार टंकसाळे यांच्याकडील तपासावर आहे़ दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व तक्रारदाराचा गुन्हा नोंद करण्यासाठी लाच घेणारे पोलीस उपनिरीक्षक यांनी तक्रारदाराकडे २० हजार रूपचे लाचेची मागणी केली होती़ मात्र तडजोडी अंती ८ हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम पोलीस नाईक संतोष चव्हाण यांच्या मार्फत स्वीकारताना रंगेहाथ पकडले़
ही कारवाई सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस उपअधिक्षक अरूण देवकर, पोलीस निरीक्षक मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली केली़ याप्रकरणी दोघां पोलीसांविरूध्द जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे़