अमित सोमवंशी आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : पार्किंगला जागाच नसल्याने भले तरी दंड देऊ पण जागा मिळेल तेथे गाड्या लावू ही सवय सोलापूरकरांच्या अंगवळणी पडल्याने सोलापूर शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने गेल्या वर्षभरात कारवाई केलेल्या वाहनांची संख्या लाखाकडे चालली असून सुमारे तीन कोटींचा दंड वसूल केला आहे. तथापि पार्किगच्या समस्येकडे मनपा अथवा पोलीस कोणीच गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र सोलापुरात पहावयास मिळत आहे. गेल्या बारा महिन्यात बेशिस्त दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांवर कारवाई करून २ कोटी ८१ लाख ७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले. शहर वाहतूक शाखेचा कारवाईबाबत हा विक्रमच असून, इतक्या मोठ्या प्रमाणावर दंड वसूल झालेला आहे. यात सर्वाधिक वाटा नो पार्किंगमध्ये वाहनांचाआहे हे विशेष.शहरात दुचाकी, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, चारचाकी वाहनधारकांनी सीटबेल्ट न लावणे, कागदपत्रांची पूर्तता नसणे आदी नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. मुख्य चौक तसेच गर्दीच्या ठिकाणी वाहन पार्किंग करणाºयांची वाहनेदेखील वाहतूक शाखेच्या गाडीत नेत त्यांच्यावरदेखील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांनी अनेकदा समज देऊनही बेशिस्त वाहनचालकांच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याचे दिसून येते.पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव, दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक एस. एस. काने वेगवेगळे उपक्रम राबवून वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे; मात्र या आवाहनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सीट, रहदारीस अडथळा, मद्य सेवन करून वाहन चालविणे, फॅन्सी नंबरप्लेट, भरधाव वाहन चालविणे, रस्त्यावर हातगाडी, चारचाकी वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे आदी कारणांवरून कारवाई करण्यात आली आहे़ वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाºया ६ हजार ३७८ जणांवर वाहतूक शाखेने कारवाई करुन लाखो रुपयांचा दंड वसूल केला.
वर्षभरात ९१ हजार वाहनांवर कारवाई; तरीही सोलापूर शहरातील वाहतुकीला शिस्त लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 2:27 PM
पार्किंगला जागाच नसल्याने भले तरी दंड देऊ पण जागा मिळेल तेथे गाड्या लावू ही सवय सोलापूरकरांच्या अंगवळणी पडल्याने सोलापूर शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने गेल्या वर्षभरात कारवाई केलेल्या वाहनांची संख्या लाखाकडे चालली असून सुमारे तीन कोटींचा दंड वसूल केला आहे.
ठळक मुद्देपार्किगच्या समस्येकडे मनपा अथवा पोलीस कोणीच गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र सोलापुरात पहावयास मिळत आहेबेशिस्त दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांवर कारवाई करून २ कोटी ८१ लाख ७ हजार रुपयांचा दंड वसूलशहर वाहतूक शाखेचा कारवाईबाबत हा विक्रमच