करमाळा : शहरात कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी करमाळा पोलिसांनी तीन दुकानदारांवर कारवाई केली आहे. या प्रकरणी तीन व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास करमाळा शहरातील गुगळे किराणा दुकानात सोशल डिस्टन्स पाळत नसल्याने, ही कारवाई करण्यात आली. हे दुकान अत्यावश्यक सेवेमध्ये येत असताना नियमांचे उल्लघन होत आहे. दुकान मालक संतोष पोपटलाल गुगळे (रा.राशीन पेठ करमाळा) यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्या दुकानामध्ये २४ ते २५ नागरिक होते.
अशीच कारवाई सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास भंडारे रेडिमेट अँड होजीअरी या कापड दुकानावर झाली. अत्यावश्यक सेवेत येत नसताना, हे दुकान मालक सुरेश किसनराव भंडारे (रा.राशीन पेठ करमाळा) यांनी सुरू ठेवले होते.