या कारवाईमध्ये तहसीलदार स्वप्नील रावडे, पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, मारापूरचे मंडल अधिकारी यू. जे. पोलके, बोराळेचे मंडल अधिकारी आर. एस. बनसोडे, हुलजंतीचे तलाठी व्ही. ए. एकतपूरे, मुढवीचे तलाठी एस. एस. लोखंडे, घरनिकीचे तलाठी ए. डी. जिरापूरे, कोतवाल डी. एस. लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान बोरसे, हवालदार दयानंद हेंबाडे, श्रीमंत पवार, पोलीस चव्हाण,सुहास देशमुख, प्रवीण सावंत, कृष्णा जाधव, चालक प्रकाश नलावडे, अजित मुलाणी आदी सहभागी झाले होते.
आठ दिवसापासून ओझेवाडी, मुढवी या भागातून खुलेआम बोटीद्वारे वाळू उपसा केला जात होता. याबाबत पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना माहिती असतानाही याकडे दुर्लक्ष केले जात होते. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोलीस खात्यात मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ही अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
----