सोलापूर : पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांचे आदेशान्वये टेभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील करमाळा चौक रोडवर नरसिंगपुर भीमा नदीच्या पाञातून अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक होत असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली़ या कारवाईत ३ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ याप्रकरणी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीसांनी दिली.
ग्रामीण पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस अधीक्षक यांच्या विशेष टिमने करमाळा चौक रोड येथे नरसिंगपुर भिमा नदीच्या पाञातून चोरून वाळू उपसा करून वाहतूक करणारे १ वाहन त्यात १ ट्रक वाळु, वाहन असा ३ लाख ४० हजार हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी सचिन केशव जगताप ( रा. निरा नरसिंगपुर) यास ताब्यात घेऊन टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील पोनि़ सुधाकर कोरे, पोसइ ए. एस. तांबे, पोसइ डी. एस. दळवी, पो.कॉ.कोंडीबा मोरे, योगेश येवले, मयूर कदम , रविराज गटकूळ,देशमुख, तळेकर चालक आनंद डीगे, या टिमने केली आहे़