आॅनलाइन लोकमत सोलापूरअक्कलकोट दि २४ : तालुक्यातील शेगाव येथील भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन वाहतूक करणारी चार वाहने, २४ ब्रास वाळू असा ५५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई २१ जानेवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली.शेगावजवळील भीमा नदीपात्रातून एम. एच. २५/ एफ. ३0, एम. एच. २५/ एफ. ४१, एम. एच. 25/ ए. फ. ११११, एम. एच. २५ / यू. २१५७ या प्रत्येक वाहनामध्ये सहा ब्रास वाळू अवैधपणे वाहतूक करीत असताना सुलेरजवळगे व काझीकणबसमध्ये अक्कलकोट तहसीलच्या पथकाने कारवाई केली. १८ ब्रास वाळूची किंमत १ लाख २६ हजार, तर डंपरची ५४ लाख असा एकूण ५५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई करजगी मंडळाचे मंडल अधिकारी जे. जु. जुजगार यांच्या नेतृत्वाखाली गावकामगार तलाठी शिवू कोळी, बी. पी. कुंभार, प्रदीप जाधव, नुरुद्दीन मुजावर यांच्यासह पोलीस पाटील श्रीकांत पाटील (हिळ्ळी), खाजप्पा शिवशरण (कुडल), रवींद्र शिर्के (देविकवठे), तुकाराम कामाठी (आंदेवाडी), कोतवाल प्रवीण गुंजले (हिळ्ळी), काशिनाथ माने (शावळ), बंदेनवाज दफेदार (मंगरुळ), विठ्ठल गुरव (घुंगरेगाव) यांनी केली. --------------------दोन वाहनचालक पळून गेलेया वाहनांवरील चालक अर्जुन सुरेश मंजुळे, विजय सदाशिव राठोड यांच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम दक्षिण पोलीस ठाण्यात चालू होते. ही वाहने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आवारात लावण्यात आली आहेत. कारवाईदरम्यान पथकाला चकवा देत दोन वाहनचालक पळून जाण्यात यशस्वी झाले.
शेगांव येथील अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई, ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त:, अक्कलकोट तहसील पथकाची कारवाई सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:37 PM
तालुक्यातील शेगाव येथील भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन वाहतूक करणारी चार वाहने, २४ ब्रास वाळू असा ५५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ठळक मुद्देसुलेरजवळगे व काझीकणबसमध्ये अक्कलकोट तहसीलच्या पथकाने कारवाईकारवाईदरम्यान पथकाला चकवा देत दोन वाहनचालक पळून जाण्यात यशस्वी