सोलापूर : यल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगाव दंगल घडलेली नाही. या दंगल प्रकरणात संभाजी भिडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही यापूर्वीही केली होती. आजही मागणी कायम आहे असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
भीमा कोरेगाव प्रकरणात पुणे पोलिसांनी भिडे यांना क्लीन चिट दिली आहे. याबद्दल आठवले म्हणाले, भीमा कोरेगाव दंगलीमध्ये दलितांना टार्गेट करण्यात आले. पोलिसांना भिडे यांच्याविरुद्ध पुरावे मिळाले नसतील. कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे.
भिडे यांच्यावर कारवाई करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बोललात का? असे विचारले असता आठवले म्हणाले, हा विषय राज्याच्या अखत्यारीत आहे. त्याचा मोदी आणि शहा यांच्याशी संबंध नाही.