मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिलेल्या भेटीदरम्यान ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शिरसी व गोणेवाडी दरम्यान वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाने कारवाईच्या भीतिपोटी पोलीस शिपाई गणेश सोलनकर यांना धडक देऊन ठार मारले. याबद्दल घटनास्थळाला विशेष पोलीस महानिरीक्षक लोहिया यांनी भेट दिली. मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या आवारात या गुन्ह्यातील जप्त केलेल्या वाहनाची कसून तपासणी केली. पोलीस ठाण्यात या गुन्ह्यातील संशयित आरोपींकडे कसून चौकशी केली.
सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन परिवर्तन मोहिमेने गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच अवैध धंद्यांचं समूळ उच्चाटन होत आहे. ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविल्याबद्दल पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांचे कौतुक केले. पोलीस प्रशासन समाजाच्या हितासाठी प्रयत्नशील असते. वाळू व्यवसायात तरुण पिढीचा शिरकाव चिंताजनक आहे. ऑपरेशन परिवर्तन या धर्तीवर वाळू व्यवसायात येणाऱ्या तरुण पिढीला कसे परावृत्त करता येईल, याबाबत मोहीम राबविण्याची विनंती पोलीस अधीक्षक सातपुते यांना केली. चोऱ्या, दरोडेसारख्या घटनेतील रखडलेले तपास गतीने करून आरोपी जेरबंद करण्याच्या सूचनाही लोहिया यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील, सांगोला पोलीस निरीक्षक सुहास जगताप आदी उपस्थित होते.
वाळू उपशाला पाठबळ देणाऱ्यांवर करणार कारवाई
बेकायदेशीर वाळू उपशासाठी कुप्रसिद्ध असलेल्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून छापे टाकले जातील. वाळूचोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल. वाळू उपशास पाठबळ देणाऱ्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करून, महसूल व पोलिसांचे एकत्रित पथके तयार करून संयुक्त कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी याप्रसंगी सांगितले.
शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्या
मयत पोलीस गणेश सोलनकर यांच्या कुटुंबातील पात्र व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर तत्काळ नोकरीत सहभागी करून घ्यावे. त्याचबरोबर, या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी विमा योजनेसह शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक लोहिया यांनी एसपी तेजस्वी सातपुते व डीवायएसपी राजश्री पाटील यांना दिल्या आहेत.
फोटो ओळी :::::::::::::::::::
मंगळवेढा पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेल्या टेम्पोची पाहणी करताना, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, एसपी तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप.
260921\img-20210926-wa0054-01.jpeg
फोटो ओळी- मंगळवेढा पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेल्या टेम्पोची पाहणी करताना विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया,एसपी तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप