सोलापूर एमआयएमचा शहराध्यक्ष तौफिक शेख याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई
सोलापूर : येथील सराईत गुन्हेगार व एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष, सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक तौफिक इस्माईल शेख यास एमपीडीए कायद्यान्वये शहर पोलीसांनी स्थानबध्द केले आहे़ तौफीक शेख हा सदर बझार पोलीस ठाण्याच्या गुंडा रजिस्टरमध्ये नोंद असलेला गुन्हेगार आहे़ त्याविरूध्द सन १९८९ पासून माहे फेबु्रवारी २०१७ पर्यंत सोलापूर शहरातील विविध पोलीस ठाण्यात विविध कलमांर्तत २९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत़ गेल्या अनेक वर्षापासून तौफीक शेख हा हल्ला करणे, खंडणी मागणे, बेकायदेशीर दुकान, घरजागा बळकाविणे, घराविषयी आगळीक करणे खुनाचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे केले आहेत़ शिवाश शहरातील विविध भागात दहशत निर्माण करून ती आजतागायत कायम ठेवली आहे़ त्यांच्या गुन्हेगारी कारवाया लोकांमध्ये अशांतता निर्माण करून समाजातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरत आहेत तो समाजासाठी धोका बनलेला होता म्हणून शहर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगांवकर यांनी त्यांच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली़ त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी करण्यात आली़