सांगोला : मद्यप्राशन करून दुचाकी चालविल्याप्रकरणी पोलिसांनी सांगोला शहर व तालुक्यातील दहा जणांना पकडून त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत म्हणून शासनाने दंडाच्या रकमेत वाढ केली. तरीही मद्यप्राशन करून दुचाकी चालविणाऱ्यांच्या संख्येत घट होत नसल्याचे दाखल गुन्ह्यांच्या संख्येवरून स्पष्ट होत आहे. पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शंभुदेव घुगे, हवालदार खिलारे, पवार, कदम हे गस्त घालत असताना भरधाव वेगात निघालेले सुखदेव मदने (रा. य. मंगेवाडी), सुरेश माने (रा. वाढेगाव), यशवंत पाटोळे (रा. करोली ता. कवठेमहांकाळ), राजेंद्र साठे (रा. बागलवाडी), आनंदराव पवार (रा. कडलास), नाना कुचेकर (रा. महुद), संतोष दिवटे, अमोल जाधव व मायाप्पा कोळेकर (रा. सांगोला), बाबासाहेब सुरवसे (रा. सांगोला) या दहा स्वारांवर कारवाई करण्यात आली.
मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या दहा जणांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:19 AM