सोलापूर : जिल्ह्यात अन्नधान्य व भाजीपाल्याचा साठा मुबलक आहे. त्यामुळे एकाचवेळी खरेदीसाठी गर्दी करू नका, असे आवाहन करण्यात आले़ याशिवाय खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरूच ठेवणे बंधनकारक असल्याचे आदेश बुधवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर लोकांची पुन्हा खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. अन्नधान्य व भाजीपाल्याच्या विक्रीला कोणतीही बंदी नाही. संचारबंदी असली तरी किराणा व भाजीपाला आणण्यासाठी सवलत दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता दुकानासमोर ठराविक अंतर ठेवून या वस्तू खरेदी करता येणार आहेत. नागरिकांनी अगोदर आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. रस्त्यावर आल्यावरच कोरोनाची बाधा होण्याची शक्यता बळावत असते. त्यामुळे गरजेच्यावेळीच लोकांनी खरेदीसाठी यावे. १५ एप्रिलपर्यंत अन्नधान्य किंवा भाजीपाल्याचा तुटवडा होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली आहे.
अन्नधान्य व भाजीपाला वाहतूक करणाºया वाहनांना पोलीस अधीक्षक व आरटीओतर्फे पास देण्यात येणार आहेत. पोलिसांकडूनही अशा वाहनांची अडवणूक होणार नाही अशा सूचना दिलेल्या आहेत. खासगी डॉक्टर दवाखाने बंद करीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. जिल्ह्यात अन्नधान्याचा साठा पुढीलप्रमाणे आहे. सरकारी वितरण प्रणालीत रेशनचा साठा. गहू : १७ हजार ४६१ मे. टन, तांदूळ : १0 हजार ५३४ मे. टन, डाळ : २५ मे. टन, साखर : १५0 मे. टन. खुल्या बाजारातील साठा. गहू: १३ हजार ६00 मे. टन, तांदूळ: १७ हजार ५00, ज्वारी: २१ हजार ५00, साखर: २८५0, डाळी: ९ हजार ८७७, खाद्यतेल: ९८ हजार ५५0 लिटर, गॅस सिलिंडर: २५ हजार २0५, पेट्रोल: ८ हजार ८२५ लिटर, डिझेल: २३ हजार ८७५ लिटर. हा दररोजचा साठा आहे. त्याचबरोबर सर्व बाजार समित्या सुरू आहेत. येथील भाजीपाल्याचे लिलाव सुरूच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे सोलापूर शहर किंवा जिल्ह्यात कोठेच अन्नधान्य व भाजीपाल्याची टंचाई होणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे.
तीन रुग्ण निगराणीखाली- शासकीय रुग्णालयात आत्तापर्यंत २५ संशयित उपचारासाठी दाखल झाले, त्यापैकी २२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता फक्त तीन जणांवर उपचार सुरू असून, त्यांचे अहवाल यायचे आहेत. त्यांची तब्येत ठिक आहे. घरी निगराणीखाली ठेवण्यात आलेल्यांची संख्या २१५ इतकी आहे. यातील ७३ जणांचा कालावधी संपला आहे. १३७ जण अद्याप निगराणीखाली आहेत. शहरात निगराणीखाली ठेवण्यात येणाºया कक्षात ५३ जणांना ठेवण्यात आले होते. त्यापैकी २७ जणांचा कालावधी संपला आहे. अद्याप २६ जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात येणाºया प्रवाशांची तपासणी करण्यासाठी ४ ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी ११६५ वाहन तपासून त्यातून प्रवास करणाºया ४ हजार १११ तर आंतर-जिल्ह्यात केलेल्या तीन ठिकाणच्या नाकेबंदीत २ हजार ९९0 वाहने अडवून १० हजार ९९७ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे.