यावेळी पंचायत समिती सदस्य हरिदास शिंदे, बाजार समिती संचालक प्रकाश चोरेकर, उद्योगपती सिद्धेश्वर काळे,नागनाथ गवळी, चपळगावचे सरपंच उमेश पाटील, बाबासाहेब पाटील उपस्थित होते.
शिरापूर उपसा सिंचनचे पाणी नरोटेवाडीला जाण्यासाठी विनामोबदला शेती दिल्याने बाजार समिती संचालक प्रकाश चोरेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब पाटील, माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, नरोटेवाडी सरपंच राधाताई गाडे, प्रमोद गवळी, विशाल भोसले, भारत बोंगे, सुनील पाटील, मधुकर शिंदे, सुनील जाधव, नानासाहेब पवार, सुदर्शन पाटील, धनंजय गायकवाड, गणपत बचुटे, पप्पू साखरे, प्रकाश पाटील, संयाेजक उमेश भगत आदींसह तालुक्यातील विविध गावचे नागरिक उपस्थित होते.
त्या कार्यकर्त्यांचे सोनं करतो
सध्या पंचायत समिती सभापती पदासंबंधी सुरू असलेल्या वादाला अनुसरुन बोलताना दिलीप माने म्हणाले, जे कार्यकर्ते माझा शब्द ऐकतात, त्या कार्यकर्त्यांचे मी राजकारणात सोनं करतो. कार्यकर्त्यांच्या हेकेखोरपणामुळे काही ग्रामपंचायती गमवाव्या लागल्याचे त्यांनी सांगितले.
--१९नरोटेवाडी-सरपंच सत्कार
उत्तर सोलापूर तालुक्यातील नूतन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करताना माजी आमदार दिलीप माने. यावेळी उत्तरच्या सभापती रजनी भडकुंबे, हरिदास शिंदे आदी.