शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
2
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
4
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
5
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
6
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
7
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
8
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
9
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
11
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
12
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
13
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
14
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
15
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
16
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
17
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
18
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
19
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
20
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

solapur tourism; पक्षी सौंदर्याबरोबरच ‘सैराट’ची स्थळे पाहण्यासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:28 PM

नासीर कबीर  करमाळा : तालुक्याच्या पश्चिम भागात निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या उजनी लाभक्षेत्रात कृषी पर्यटन विकासाची मोठी संधी सध्या खुणावत ...

ठळक मुद्देउजनी पाणलोट क्षेत्राच्या स्थळावर पर्यटकांना निवासाची व हॉटेलिंगची व्यवस्थापरदेशात जाऊन प्रेक्षणीय स्थळे पाहण्यापेक्षा उजनी धरण लाभक्षेत्रात पर्यटकांना लागणाºया सोयीसुविधा पुरविल्याकरमाळा शहरातील पुरातन किल्ला या स्थळांचे चित्रीकरण झाल्याने राज्यभरातील पर्यटक येथे येऊन आनंद लुटत असतात

नासीर कबीर 

करमाळा : तालुक्याच्या पश्चिम भागात निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या उजनी लाभक्षेत्रात कृषी पर्यटन विकासाची मोठी संधी सध्या खुणावत आहे. धरणग्रस्त शेतकºयांनी प्रयत्न केले तर रोजगारनिर्मिती बरोबरच उजनी लाभक्षेत्र पर्यटकांना हा उत्तम पिकनिक पॉर्इंट ठरू शकतो. पक्षी सौंदर्य आणि ‘सैराट’ चित्रपटातील दिलखेच स्थळे पाहण्यासाठी पर्यटकांची इकडे सतत गर्दी असते. ही गर्दी व्यावसायिकदृष्ट्या खेचली तर तालुक्यात नवे आर्थिक स्रोतही निर्माण होऊ शकतात.  

पक्षी सौंदर्याबरोबरच ‘सैराट’ची स्थळे पाहण्यासाठी गर्दीनिसर्गसौंदर्य आणि धार्मिक पर्यटनाने नटलेला सोलापूर जिल्हा म्हणजे अवघ्या महाराष्टÑाचं आकर्षण.  पंढरीचा विठुराया आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आणि सोलापूरचे श्री सिद्धरामेश्वर अवघ्या देशभरातील भक्तांनाच ओढीनं खेचणारे!  निसर्गानेही मुक्तहस्ताने या जिल्ह्यावर उधळण केलीय.  धरण अन् प्रकल्पातून एक नवे सौंदर्य सोलापूर जिल्ह्याला लाभले आहे.  राष्टÑीय पर्यटन दिनाच्या निमित्तानं ‘लोकमत’च्या वाचकांसाठी मांडलेला हा लेखाजोखा.

सोलापूर जिल्ह्याच्या टोकाला व अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या करमाळा तालुक्यात पश्चिम सरहद्दीवरून वाहणाºया  भीमा  नदीवर उजनी धरणामुळे करमाळा तालुक्यातील पश्चिम भाग सुजलाम्-सुफलाम् बनला आहे. उजनीतील पाण्यामुळे निसर्गसौंदर्याने नटलेल्या कुगाव, चिखलठाण, वांगी, टाकळी, कोंढारचिंचोली, कात्रज, खातगावचा परिसर पर्यटन केंद्र बनू पाहत आहे. करमाळा शहरातील भुईकोट किल्ला, पोथरे येथील शनैश्वर मंदिर, उजनी काठावरील चिखलठाण येथील कोटलिंगाचे मंदिर, हिवरे येथील नागोबा व हिवरे येथील नागनाथाचे मंदिर, सीना नदीकाठावर असलेल्या संगोबाचे आदिनाथ मंदिर अशी प्राचीन धार्मिक स्थळे करमाळा तालुक्यात असून उजनी लाभक्षेत्रात ठिकठिकाणी फ्लेमिंगोसारखे  देशी-विदेशी प्रजातीचे पक्षी अभ्यासक  शिवाय डिकसळचा ब्रिटिशकालीन रेल्वेचा पूल व या परिसराची सुंदरता वाढवित आहे. हे निसर्गसौंदर्य टिपण्यासाठी पर्यटकांचा लोंढा या परिसरात सतत वाहत असतो.

सैराटमुळे उजनी व देवीमंदिर परिसरात गर्दी

  • -  नागराज मंजुळे यांनी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या सैराट चित्रपटाचे चित्रीकरण उजनी धरण परिसरात करमाळा तालुक्यातील कंदर, पोफळज, कुगाव, बिटरगाव-श्री, सांगवी, करमाळा, श्रीदेवीचामाळ  या भागात झाले. कुगाव येथे धरणाच्या पाण्यात बुडालेला इनामदार यांचा वाडा, वांगी येथील पुरातन मंदिराचे अवशेष चित्रपटात चित्रित केले होते. 
  • - करमाळ्यातील श्रीदेवीचामाळ येथील श्रीकमलादेवी मंदिर, शाहन्नव  पायºयांची विहीर, वाळलेले झाड, करमाळा शहरातील पुरातन किल्ला या स्थळांचे चित्रीकरण झाल्याने राज्यभरातील पर्यटक येथे येऊन आनंद लुटत असतात.

पर्यटकांना सोयी-सुविधा व्हाव्यात

  • - निसर्ग सौंदर्याने नटलेल्या करमाळा तालुक्यातील उजनी पाणलोट क्षेत्राच्या स्थळावर पर्यटकांना निवासाची व हॉटेलिंगची व्यवस्था नाही. पर्यटक मोठ्या आनंदाने येत     असले तरी मुक्कामाची कसलीही व्यवस्था नसल्याने मुक्कामी थांबत नाहीत. 
  • -  परदेशात जाऊन प्रेक्षणीय स्थळे पाहण्यापेक्षा उजनी धरण लाभक्षेत्रात पर्यटकांना लागणाºया सोयीसुविधा पुरविल्या तर स्थानिक श्ोतकºयांना पर्यटकांच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल, अशी अपेक्षा कुगावचे शेतकरी धुळाभाऊ कोकरे यांनी व्यक्त केली.
टॅग्स :Solapurसोलापूरtourismपर्यटनUjine Damउजनी धरणbirds sanctuaryपक्षी अभयारण्य