श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची शासन नियमानुसार कोरोनामुळे ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने पार पडली आहे. या सभेत बारामती ॲग्रोला आदिनाथ कारखाना भाडेपट्टा करारावर देण्यासंदर्भात झालेल्या ठरावावर उपस्थित ९८ टक्के सभासदांनी ऑनलाईन मतदान केले. या सभेत सभासद, वाहतूकदार, कर्मचारी यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. या सभेसाठी ६१२ सभासद ऑनलाईन उपस्थित होते. सभासदांच्या प्रत्येक ठरावाला मतदान घेऊनच ठराव मंजूर केला. कर्मचा-यांचे पगार, वाहतूकदारांचे व ठेकदारांचे देणे या संदर्भात या सभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आले. ९८ टक्के सभासदांनी मतदान केल्यामुळे हा कारखाना अधिकृतरित्या बारामती ॲग्रोकडे जाण्याचा अडथळा संपुष्टात आला आहे. या सभेवेळी चेअरमन धनंजय डोंगरे यांनी ठरावाचे व प्रश्नाचे वाचन केले. कार्यकारी संचालक अरुण बागनवर यांनी आभार मानले.
यावेळी संचालिका रश्मी बागल, नानासाहेब लोकरे, पांडुरंग जाधव, प्रकाश पाटील, अविनाश वळेकर, नामदेव भोगे, मंदा लक्ष्मण गोडगे, भामाबाई दिलीप केकाण, सचिन पांढरे, आशिष गायकवाड, स्मिता पवार उपस्थित होते.
कोट :::::::::
श्री आदिनाथ कारखान्याची सर्वसाधारण सभा कोरोनामुळे शासन नियमानुसार आम्ही ऑनलाईन पध्दतीने घेतली. या सभेसाठी एकूण ६१२ सभासद ऑनलाईन उपस्थित राहिले. या सभेसाठी ऑनलाईन पध्दतीनेच ठरावावर मतदान घेतले. सर्व प्रश्नाची उत्तरे आम्ही दिली आहेत.
- धनंजय डोंगरे,
चेअरमन, आदिनाथ सहकारी साखर कारखाना.
फोटो
३१ करमाळा- आदिनाथ कारखाना
ओळी : आदिनाथ कारखान्याच्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी चेअरमन धनंजय डोंगरे, कार्यकारी संचालक अरून बागनवर.