येथील आदिनाथ कारखान्याने आक्टोबर २०१७ ते जुलै २०१९ या कालावधीत कामगारांच्या पगारीतून भविष्यनिर्वाह निधी कपात केला पण त्याची रक्कम जमा केली नव्हती. या प्रकरणी कारखान्याकडे भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने चौकशी केली असता कारखान्याच्या कामगारांचे भविष्य निर्वाह निधी, पेंशन निधी व इन्शुरन्स निधीची एकूण ४ कोटी १२ लाख ८४ हजार ३५ रूपये थकीत रक्कम असल्याचे दिसून आले. या रक्कमेवर डिसेंबर २०२० अखेर १ कोटी १३ लाख ५ हजार ५०७ रूपये व्याजाची रक्कम आकारली. त्याशिवाय कारखान्याने मार्च २०१२ ते सप्टेबर २०१७ पर्यंत कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम वेळेत न भरता उशीराने भरल्याने भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने चौकशी करून त्यावर विलंब आकार व त्यावरील व्याजापोटी १ कोटी ४२ लाख ७२ हजार ४६ रूपयांची आकारणी केली. त्यानुसार आदिनाथ कारखान्याकडे कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीचे ६ कोटी ६८ लाख ६१ हजार ५८८ रुपये भरणा करणे आवश्यक असताना तो भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने कारखान्याचे बँक खाती गोठवून १३ लाख ७७ हजार २८२ रूपयांची वसुली केली. उर्वरीत रकमेसाठी महसूल अधिनियमानुसार कारखान्याकडील २ हजार ५०० क्विंटल साखर जप्त केली. त्याचा ५ फेब्रुवारी रोजी कारखानास्थळी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने जाहीर लिलाव केला.
या प्रकरणी सोलापूर विभागीय भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाचे प्रवर्तक अधिकारी भानुप्रकाश, प्रतीक लाखोले, लेखाधिकारी एच. जेवळीकर, पर्यवेक्षक संजय मगदुम, सुरक्षा सहाय्यक सुमितकुमार सिन्हा, योगेश जडगौडर यांनी कारवाई केली.
न्यायालयाकडून स्थगिती न मिळाल्याने लिलाव
आदिनाथच्या साखर लिलाव करण्यास शिखर बँकेने विरोध करून मुंबई उच्चन्यायालयात स्थगितीची याचिका दाखल केली होती, पण साखर लिलावास स्थगिती न मिळाल्याने कर्मचारी भविष्यनिधी कार्यालयाने जाहीर लिलाव केला.
कोट :::::::: आदिनाथच्या साखरेचा लिलाव झालेला असून बोली बोलणा-या व्यापा-यांना साखरेचे वितरण सुरू आहे. वितरण पूर्ण झाल्यानंतर लिलावातून मिळणा-या रकमेचे व व्याजाचे कारखान्याच्या कर्मचा-यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल.
- डॉ. हेमंत तिरपुडे,
आयुक्त, विभागीय भविष्य निर्वाह निधी कार्यालय
फोटो
१३करमाळा-आदिनाथ कारखाना
ओळी
आदिनाथ कारखान्याच्या साखरेचा जाहीर लिलाव करताना भविष्यनिधी कार्यालयाचे कर्मचारी व लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेले व्यापारी.