कुंभार गल्ली-सांगोला येथील सतीच्या विहिरीतून कुंभार गल्ली व रामोशी गल्ली येथील सार्वजनिक शौचालयास पाणी पुरवठा करणे (३ लाख ६४ हजार ५३४ रुपये), कोष्टी गल्लीतील आडातून भोपळेरोड व खडतरे गल्ली सार्वजनिक शौचालयास पाणीपुरवठा करणे (४ लाख ३९ हजार ६०१ रूपये), आठवडा बाजारातील विहिरीतून सनगर गल्ली-भीमनगर व साठेनगर येथील सार्वजनिक शौचालयास पाणी पुरवठा करणे (४ लाख ३४ हजार १२७ रूपये), अंबिकादेवी मंदिराजवळील आडातून धनगर गल्ली व आ. क्र. ४४ शॉपिंग सेंटर येथील सार्वजनिक शौचालयास पाणीपुरवठा करणे (३ लाख ३२ हजार ४७५ रूपये), नगर परिषद कार्यालयामागील आडावरून तेली गल्ली येथील सार्वजनिक शौचालयास पाणीपुरवठा करणे (३ लाख ३४ हजार १९६ रूपये) त्याचबरोबर नगर परिषद सांगोलांतर्गत चिंचोली विहीर ते जलशुद्धीकरण केंद्र उद्धारण नलिका टाकणे व उपसा यंत्रे बसविणे (१ कोटी ६८ लाख २५ हजार ७६१ रूपये) या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती नगराध्यक्षा राणी माने यांनी दिली.
१ कोटी ८७ लाख रूपयांच्या कामास प्रशासकीय मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 4:27 AM