इयत्ता १० वी व १२ वीच्या झालेल्या पुनर्परीक्षेचा निकाल लागल्यानंतर राज्यामध्ये इयत्ता ११ वी व पदवी अभ्यासक्रमासाठी एक ज्यादा प्रवेश फेरी घेतली गेली. त्याच पद्धतीने समुपदेशक फेरी घेऊन प्रवेशाची मुदतवाढ द्यावी, या मागणीचे पत्र असोसिएशनच्या माध्यमातून उच्च व तंत्रशिक्षण विभागाला देण्यात आले आहे.
पदविका औषधनिर्माणशास्र या अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश फेरीमध्ये रिपोर्टिंगचे प्रमाण ३५ टक्के आहे. दुसऱ्या फेरीच्या वेळी रिपोर्टिंगचे प्रमाण ३० टक्केपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॅप राऊंडमधील ३५-३५ जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. कारण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बरेचशे विद्यार्थी घराजवळच्या महाविद्यालयास प्रवेश घेण्यास पसंती देत आहेत. राज्यामध्ये पदविका औषधनिर्माणशास्र या अभ्यासक्रमास मागील वर्षापेक्षा ४० टक्केपेक्षा जास्त अर्जाची संख्या आहे. केवळ दोन प्रवेशाच्या फेऱ्या घेतल्याने प्रवेश फेरीतील शासकीय रिक्त जागांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गरीब, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. पहिल्या फेरीमध्ये जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेशाची जागा निश्चित केली नाही. त्याचे कारण म्हणजे यातील सीईटीला चांगले गुण असणारे विद्यार्थी पदवी औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे पदवी औषधनिर्माणशास्र या अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयास प्रवेश घेण्याची ३१ जानेवारी करण्यात यावी, अशी मागणी प्रा. झोळ यांनी केली आहे.