आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि. ०६ :- उत्पादनात दुपटीने वाढ होण्यासाठी राज्य सरकार यंदापासून उन्नत शेती, समृध्द शेतकरी अभियान राबवित आहे. या अभियानातुन उत्पादन वाढीसाठी जिल्ह्यामध्ये खरिपात कृषि विभाग, आत्मा व एमएसीपी प्रकल्पांतर्गत वेगवेगळ्या पिकांचा २९०० हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिक उपक्रम राबविला जाणार आहे. उपक्रमात निवड झालेल्या शेतक-यांना खते , बियाणे , किटकनाशके खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे. जिल्ह्यामध्ये २९७ प्रकल्प असतील.पिकांचे वैविध्यीकरण करणे , शेतमालाच्या बाजारभावातील नियमित चढ झ्र उतार, शेतक-यांना विक्रीचे तंत्र अवगत करून देणे, शेतीपूरक व्यवसायांना चालना देणे, प्रत्येक तालुक्यातील प्रमुख पिकांची उत्पादकता वाढविणे उद्देश अभियानाचा आहे.विविध अवजारे, सूक्ष्म सिंचन संच आणि इतर पायाभुत सुविधांचे अनुदान थेट शेतक-यांच्या बँक खात्यात जमा होईल . या उपक्रमांतर्गत कृषि विभागातर्फे तसेच आत्मा व एमएसीपी प्रकल्पांतर्गत विविध पिकांची प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. जमिन आरोग्य पत्रिकानुसार कोणत्या खताची कमतरता आहे. त्याबाबत कृषि विद्यापिठाचे शास्त्रज्ञ , कृषि विभागाचे अधिकारी आणि संबंधित पिकाची उत्पादकता जास्ती कमी आहे तेथील शेतक-यांशी समन्वय साधून मार्गदर्शन करत आहेत.गावांत पिकांची उत्पादकता कमी आहे तेथील शेतक-यांची प्रकल्पात निवड केली जाईल. प्रत्येक प्रकल्प दहा हेक्टरचा असेल. निवड झालेल्या शेतक-यांनी खते , बियाणे , किटकनाशके खरेदी केल्यावर त्याबाबतचे अनुदान थेट खात्यावर जमा होईल. कृषी, आत्मा, एमएसीपी खात्यांतर्गत उपक्रमातून शेती उन्नत आणि शेतकरी समृध्द होईल,असा विश्वास प्रकल्प संचालक आत्मा व्हि. एस. बरबडे, व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार यांनी व्यक्त केला आहे.
उन्नत शेती,समृध्दी शेतकरी अभियानात जिल्ह्यात २९०० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके
By admin | Published: June 06, 2017 5:19 PM