आप्पासाहेब पाटील, सोलापूर :सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणाने अखेर ८५ दिवसानंतर सोमवारी मध्यरात्री 'प्लस' मध्ये आले. उजनीत वाढलेल्या पाणीपुरवठ्यामुळे शेतकरी व सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या उजनी धरणात ६३ टीएमसी पाणीसाठा आहे.
मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह उजनी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने उजनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढतच होती. वजा ३९ टक्क्यावर गेलेले धरण मंगळवारी एक ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्लस मध्ये आल्याने शेतकरी व सोलापूरकरांनी समाधान व्यक्त केले आहे. धरणाच्या वरच्या बाजूस असलेले सर्व धरण ७० ते ८० टक्के भरले असून खडकवासला धरण ९८ टक्के भरले आहे. मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर व जिल्ह्यात संततदार पाऊस सुरू असून शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.