सोलापूर: अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील १२५ कर्मचारी मे २०१४ अखेर सेवानिवृत्त होणार असून, यामध्ये प्राथमिक शिक्षण विभागाचे ७९ कर्मचारी आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कर्मचारी वयोमानानुसार दर महिन्याला सेवानिवृत्त होतात. मे अखेर दरवर्षीच सेवानिवृत्त होणार्या कर्मचार्यांची संख्या सर्वाधिक असते. याही वर्षी ही संख्या १२५ इतकी आहे. प्राथमिक शिक्षण विभागातील ३५ उपशिक्षक सेवानिवृत्त होणार असून ३२ मुख्याध्यापक, ८ केंद्रप्रमुख तसेच ४ विस्तार अधिकार्यांचा यामध्ये समावेश आहे. आरोग्य विभागातील एक आरोग्य पर्यवेक्षक, ३ आरोग्य सहायिका, २ आरोग्य सेवक व ३ आरोग्य सेविकांचा समावेश आहे. बांधकाम खात्यातील तब्बल १२ मैलमजूर शनिवार दिनांक ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. एक कनिष्ठ अभियंता, एक स्थापत्य अभियंता सहायक, दोन वॉचमन, एक चौकीदार, दोन वाहन मदतनिसांचा समावेश आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव हे ३१ मे रोजीच सेवानिवृत्त होणार आहेत. समाजकल्याण खात्यातील विस्तार अधिकारी महादेव जमादार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी विठ्ठल राठोड, ग्रामपंचायत विभागाचे गायकवाड, अंगणवाडी पर्यवेक्षिका सी. डी. माळी, एस. आर. लोणार, जे. एस. रेडे, दोन कनिष्ठ सहायक, दोन वाहन चालक तसेच ७ परिचरांचा समावेश आहे.
------------
सरकारी जन्मतारखेचा परिणाम ४शिक्षणाचे प्रमाण कमी असताना कोणतेही मूल (मुलगा, मुलगी) शाळेत प्रवेश घेताना कोणाचीही जन्मतारीख नसायची. त्यामुळे गुरुजी एक जून ही ठराविक तारीख प्रवेशावर लिहायचे. त्यामुळे दरवर्षी ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार्या कर्मचार्यांची संख्या अधिक असते.
-----------------------
जूनमध्ये नव्याने कर्मचारी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे रिक्त होणारे वर्ग-३ व वर्ग-४ चे कर्मचारी भरले जाणार आहेत. अनुकंपा व ग्रामपंचायत कर्मचार्यांची पदे राखीव ठेवली जाणार आहेत. -प्रभू जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्र)