कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने राज्य परिवहन महामंडळाने एस. टी. बस वाहतुकीस मंगळवारपासून परवानगी दिली आहे. करमाळा बसस्थानकातून बार्शी, पंढरपूर, टेभूर्णी, कुर्डूवाडी व सोलापूरकडे जाण्यासाठी एस. टी. बसेस फलाटावर लावण्यात आल्या पण कोरोनाची दहशत अद्यापही नागरिकांत असल्याने दोन दिवसांपासून करमाळा आगारातून एकही बस प्रवासासाठी बाहेर पडली नाही.
गेल्या दीड महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एस.टी.ची बससेवा बंद असून कोरोनाची लाट ओसरू लागल्याने बससेवा सुरू होत आहे.
----
पुरेसे प्रवासी असल्याशिवाय बसमार्गावर सोडण्यात येत नाही. मार्गावर धावणाऱ्या सर्वच बसेस स्वच्छ धुवून सॅनिटायझर केल्या आहेत. प्रवाशांनी मास्क घालून सॅनिटायझरचा वापर करून बसमधून प्रवास करावा.
- अश्विनी किरगत, आगार प्रमुख करमाळा.
०२करमाळा-बस
करमाळा एस. टी.बस स्थानकावर बसेस लावण्यात आल्या पण प्रवासी नसल्याचे चित्र दिसत आहे.
---