शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

डाळिंबाचे फोटो पाहून बांगलादेशीचे व्यापारी पोहोचले बैरागवाडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 10:36 AM

फळं पोहोचली परदेशात; माने भावंडांची यशोगाथा, दोन एकरात २७ लाखांचे उत्पादन

ठळक मुद्देदुसºयाच्या शेतात किंवा अन्य ठिकाणी कामाला जाण्यापेक्षा स्वत:च्या शेतात वेगळा प्रयोग केलाऊसापेक्षा डाळिंब शेतीकडे वळलो़ त्यापासून चांगले उत्पन्न झाले़ हे सारे शक्य झाले लागवडीचे बारकावे आणि नियोजनावऱ आज बैरागवाडीचे डाळिंब बांग्लादेशातील बाजारपेठेत भाव खातेय

मारुती वाघ मोडनिंब : नोकरीच्या शोधातील दोन भावंडांनी वडिलोपार्जित शेतीचा पर्याय निवडला़़़दोन एकरावर डाळिंबाची लागवड केली...निम्मी जैविकखते आणि निम्मी रासायनिक खते वापरली...नियोजन करून ड्रीपद्वारे रोपं जगवली...अभ्यासूवृत्तीने फवारण्या करून रोगांचा प्रादुर्भाव रोखला...लाल भडक अन् दर्जेदार फळाची चर्चा सोशल मीडियावर फिरली...बांग्लादेशातील व्यापाºयांनी निर्यात केली...परिस्थितीवर मात करून संधीचं सोनं करणाºया त्या दोन भावंडांनी दोन वर्षांत २७ लाखांचे उत्पन्न घेतले.

ही किमया साधली आहे बैरागवाडी (ता़ माढा) येथील युवा शेतकरी प्रवीण आणि सचिन माने या दोन भावंडांनी़ घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असताना दहावी शिक्षणानंतर ते दोघे नोकरीच्या शोधात होते़ कंटाळून वडिलोपार्जित अवघी दोन एकर शेती करण्याचा निर्णय घेतला़ डाळिंब लागवडीच्या विचाराधीन बोअर मारुन घेतले़ त्यानंतर त्या दोघांनी दोन एकरावर भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड केली़ यासाठी त्यांनी खड्डे मारुन ८ बाय १० अंतरावर १,२५० डाळिंबाची रोपं लावली़ लागवडीपूर्वी त्या खड्ड्यांमध्ये त्यांनी १८:४६ निंबोळी पेंड, मायक्रो न्यूटन शेणखत, फोरेट वापरले़ या रोपांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले़ उन्हाळ्यात पाणी कमी पडू नये म्हणून शेततळे उभारले.

 पावसाळ्यात बोअरचे पाणी शेततळ्यात सोडून त्याचा साठा केला़ रोपं ही सहा महिन्यांची झाल्यानंतर छाटणी केली़ नंतर एका वर्षाने दुसरी छाटणी केली़ जूनमध्ये पानगळ झाली़ त्यासाठी इथे कॉल ०५२ फवारणी केली़ ५० टक्के जैविक व ५० टक्के रासायनिक खताचा वापर केला़ या साºया प्रक्रियेत लागवडीवर ७० हजार रुपये खर्च झाले.

जूनमध्ये डाळिंब पिकाचा बहार धरला़ थ्रिप्स, मावा, तुडतुडे या रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी जैविक नीम, करंजी, कापूर याची स्प्रेद्वारे फवारणी केली़ मधून रामा अग्रोटेक जैविक खत दिले़ आॅगस्टमध्ये चांगल्यापद्धतीने फळे लगडली़ फळ वाढीसाठी ड्रीपमधून लिक्विड खते दिली़ त्याचप्रमाणे तेल्या, डांबर या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नीम, करंज, कपूर याची फवारणी केली.

 सहा महिन्यात फळ काढणीस आले़ त्यासाठी कलर सोडणे, शायनिंग यासाठी पोटॅशियम सोनाईचा ड्रीपमधून वापर केला़ दव आणि उन्हामुळे प्रतवारी कमी होऊ नये आणि डाळिंब चांगल्या प्रकारचे दिसावे म्हणून प्रत्येक झाडावर जुन्या कपड्याचे पांघरून घातले.

महती सोशल मीडियावर व्हायरल- काही शेतकºयांना मोह आवरला नाही आणि त्यांनी मोबाईलवरून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले़ परिणामत: बांग्लादेशातील व्यापाºयांनी बैरागवाडी गाठून डाळिंब बागेची पाहणी केली़ त्यांनी जागेवरच ६५ रुपये किलो दराने त्याची खरेदी केली़ आज सुमारे ४० टन डाळिंब निघाले़ यामधून सरसकट २७ लाख रुपयांचे उत्पादन मिळाले.

दुसºयाच्या शेतात किंवा अन्य ठिकाणी कामाला जाण्यापेक्षा स्वत:च्या शेतात वेगळा प्रयोग केला. ऊसापेक्षा डाळिंब शेतीकडे वळलो़ त्यापासून चांगले उत्पन्न झाले़ हे सारे शक्य झाले ते लागवडीचे बारकावे आणि नियोजनावऱ आज बैरागवाडीचे डाळिंब बांग्लादेशातील बाजारपेठेत भाव खातेय.- प्रवीण माने, डाळिंब उत्पादक, बैरागवाडी (माढा)

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी