शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीकाठच्या ४३ घाटांचे वाळू लिलाव जाहीर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 3:18 PM

सोलापूर : पर्यावरण विभागाच्या नियमात अडकलेल्या भीमा नदीकाठच्या ४३ घाटातून ३८४ कोटी ८६ लाख किमतीच्या १४ लाख १४ हजार ...

ठळक मुद्देच्वाळू घाटाच्या लिलाव घेणाºयास पर्यावरण विभागाने घालून दिलेले सर्व नियम पाळणे बंधनकारक राहणार बांधकाम व्यावसायिकांना दिलासा, चोरट्या वाहतुकीवर येणार प्रतिबंधवाळूचे उत्खनन यंत्र, बोटीने करता येणार नाही. लिलाव घेतलेल्या वाळू गटातील वाळूचे हाताने उत्खनन करावे लागेल

सोलापूर : पर्यावरण विभागाच्या नियमात अडकलेल्या भीमा नदीकाठच्या ४३ घाटातून ३८४ कोटी ८६ लाख किमतीच्या १४ लाख १४ हजार ५६३ ब्रास वाळूचा लिलाव दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जाहीर केला आहे.

नद्यांमधील बेसुमार वाळू उपश्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याने हरित लवादाने वाळू उपश्याला बंदी घातली होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षात वाळू घाटाचे लिलाव न झाल्याने वाळूची बेसुमार टंचाई निर्माण झाली होती. यामुळे नद्यांमधून चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक सुरू होती. चारपट दर देऊन बांधकामदारांना ही वाळू घ्यावी लागत होती. त्यामुळे अनेक बांधकामाची कामे ठप्प झाली होती.

गरजेच्या कामे डस्टमधून उकरण्यात येत होती. चोरट्या वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी वाळू घाटाचे लिलाव करण्याच्या मागणीला जोर धरला होता. महसूल व वन विभागाने ३ जानेवारी २0१८ रोजी याबाबत निर्णय घेऊन राज्य पर्यावरण समितीकडे मान्यतेसाठी पाठविला होता. पर्यावरण समितीने मंजुरी दिल्यानंतर ३0 सप्टेंबरपर्यंत ई निविदेद्वारे जिल्ह्यातील ४३ ठिकाणच्या वाळू घाटांचे लिलाव काढण्यात आला आहे. वाळू घाटाचे ११७ प्रस्ताव आले होते, सर्वेक्षणाअंती ४३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

२१ फेब्रुवारीपासून आॅनलाईन पद्धतीने १ मार्चपर्यंत वाळूसाठी आॅनलाईन नोंदणी येईल. यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. २ मार्चपर्यंत आॅनलाईन नोंदणीसाठी दाखल केलेली सर्व कागदपत्रे छायांकित प्रतिसह उप जिल्हाधिकारी महसूल यांच्या कार्यालयात जमा करावी लागतील. २१ फेब्रुवारी ते ६ मार्चपर्यंत आॅनलाईन निविदा भरता येईल. ६ मार्च रोजी निविदा ई आॅक्शनसाठी खुली केली जाईल. ७ मार्च रोजी ई आॅक्शन होईल. 

हे आहेत वाळू घाटच्पंढरपूर: शेगाव दुमाला, मुंढेवाढी, अजनसोंड, मुंढेवाढी, देगाव, मुंढेवाडी, चळे, सुस्ते, तारापूर, चळे, अंबे, विटे, सरकोली,कौठाळी, व्होळे, ओझेवाडी, मुडवी, अक्कलकोट: म्हैसलगे, गुड्डेवाडी, आळगे, शेगाव, धारसंग, दक्षिण सोलापूर: भंडारकवठे २, बाळगी, सादेपूर, लवंगी, कारकल, टाकळी, कुरघोट, हत्तरसंग, बरूर, चिंचपूर, कुडल, औज, वडापूर, सिद्धापूर, मंगळवेढा: मिरी, तांडोर, मिरी, सिद्धापूर, तामदर्डी, घोडेश्वर, धर्मगाव, माढा: बेंबळे, वाफेगाव, चांदज, गारअकोले, आलेगाव, टाकळी, माळेगाव, शेवरे, माळशिरस: कान्हापुरी, वाघोली, तरटगाव, खळवे, उंबरे (पागे), वेळापूर (वेळापूर).

हाताने करावे लागेल उत्खननच्वाळू घाटाच्या लिलाव घेणाºयास पर्यावरण विभागाने घालून दिलेले सर्व नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे. यामध्ये वाळूचे उत्खनन यंत्र, बोटीने करता येणार नाही. लिलाव घेतलेल्या वाळू गटातील वाळूचे हाताने उत्खनन करावे लागेल. उत्खनन केलेली वाळू भरण्यासाठी यंत्राचा वापर करता येणार नाही. वाळू ठिकाणाच्या बोलीबरोबरच भूपृष्ठ भाडे, जीएसटी, टीडीस, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे शुल्क, मुद्रांक शुल्क, खनिज प्रतिष्ठान शुल्क, पर्यावरण शुल्क आकारले जाणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयenvironmentवातावरणriverनदीUjine Damउजनी धरण